एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : बाई घरही चालवते अन् सिनेमाही... 'बाईपण भारी देवा'ने आठ दिवसांत पार केला 15 कोटींचा टप्पा; IMDB मध्ये बॉलिवूडलाही टाकलं मागे

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत 15 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आठवडा झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाचा बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या आठ दिवसांनंतरही अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहे. 

माउथ पब्लिसिटीच्या जोरावर 'बाईपण भारी देवा' सुपरहिट!

'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आऊट झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता होती. एकीकडे या सिनेमाचं प्रमोशन होत असताना दुसरीकडे मात्र माउथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम केलं आहे. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहेत. 

'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... ( Baipan Bhaari Deva Box Office Collection Day 8)

'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, ओपनिंग डेला 1.3 कोटींच्या कमाई केलेल्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने आतापर्यंत 15.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

  • पहिला दिवस : 1.3 कोटी

  • दुसरा दिवस : 2.45 कोटी

  • तिसरा दिवस : 3.3 कोटी

  • चौथा दिवस : 1.2 कोटी

  • पाचवा दिवस : 1.5 कोटी

  • सहावा दिवस : 1.85 कोटी

  • सातवा दिवस : 1.61 कोटी

  • आठवा दिवस : 2 कोटी

  • एकूण कमाई : 15.20 कोटी

'बाईपण भारी देवा' या सिनेमातील गाणी, संवाद, कलाकारांचा अभिनय, मांडणी दिग्दर्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रेक्षकांसह चाहतेदेखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या सिनेमाबद्दल भाष्य करत आहेत. या सिनेमातील 'मंगळागौर' गाणं सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. 'आयएमडीबी'च्या (IMDB) रेटिंगमध्ये या सिनेमाने कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणीच्या (Kiara Advani) 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या सिनेमालाही मागे टाकलं आहे. आयएमडीबीमध्ये 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला 8.8 रेटिंग मिळाले आहे. तर 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाला 7.4 रेटिंग मिळाले आहे. 
 
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Voting Misconduct Special Report : राडा, गोंधळ, मनस्ताप...मतदारांचा संताप!Voting issues in Election Mumbai Kalyan : मतदानाची स्लो ट्रेन, आरोपांची एक्सप्रेस! Special ReportLok Sabha Elections 2024 Missing Names Special Report : यादी तयार पण नावच गायब...जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Embed widget