Marathi Serial : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी
Tharla Tar Mag : टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
3. टीआरपी लिस्टमध्ये 'रंग माझा वेगळा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
4. 'रंग माझा वेगळा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
5. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.
6. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
7. टीआरपीच्या शर्यतीत 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
8. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे.
9. नव्या स्थानावर 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.
10. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या महाएपिसोडला 5.5 रेटिंग (Aai Kuthe Kay Karte Marathi Serial)
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेच्या महाएपिसोडला 5.5 रेटिंग मिळाले आहे. तर ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. तर 'शुभविवाह' या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे. चॅनलचा टीआरपी वाढावा म्हणून चॅनलने अवधूत गुप्तेच्या 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नसून या कार्यक्रमाला फक्त 0.9 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या