Entertainment News Live Updates 8 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Oct 2022 04:09 PM
Dnyaneshwar Mauli: 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अवधूत गांधी साकारणार संत नामदेव यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Dnyaneshwar Mauli: 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूपदर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.  प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे. 


अवधूत गांधी यांनी पोस्ट शेअर करुन या मालिकेबद्दल सांगितलं. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री सद्गुरू नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या "ज्ञानेश्वर माऊली" या लोकप्रिय मालिकेत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या भूमिका करण्याचे सौभाग्य लाभले. रामकृष्णहरी ' 



Adipurush: आदिपुरुषच्या टीझरवर अभिनेते अरुण गोविल यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'धर्माची चेष्टा करू नका'

Adipurush: सध्या  'आदिपुरुष' (Adipurush)  हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. आता रामानंद सागर यांची मालिका 'रामायण' मध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे. 


Salman Khan : सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी चर्चेत आहे. आता या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांसह एका अल्पवयीन मुलाला सलमानला मारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 





Deepika Padukone: पॅरिस फॅशन वीकसाठी दीपिकानं केला खास लूक

Deepika Padukone: दीपिकानं नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. या लूकमधील फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता. दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांनी कमेंट केली.





Housefull 5 : खिलाडीकुमारच्या 'हाऊसफुल 5'च्या शूटिंगला सुरुवात

Housefull 5 Film Update : 'हाऊसफुल' (Housefull) ही सीरिज प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 2010 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाचे सीक्वल आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. आता या सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच 'हाऊसफुल 5' (Housefull 5) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



Shah Rukh Khan: 'चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे'; शाहरुखच्या ट्वीटनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष!

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा जवान (Jawan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षरकांच्या भेटीस येणार आहे. जवान चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला यामधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. नुकतच शाहरुखनं एक खास ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखनं जवान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से प्रेक्षकांना सांगितले आहेत. 



Sachin Gurav : कोल्हापूरचा सचिन गुरव असा झाला 'पोस्टरबॉय'

Sachin Gurav : सचिनचे आजोबा जनार्दन गुरव हे प्रभातमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करायचे. त्यामुळे त्याला घरातूनच बाळकडू मिळालं. सिनेक्षेत्राची गोडी निर्माण झाल्याने त्याने विश्राम सावंत यांच्या एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली. विश्राम सावंत यांच्या माध्यमातून सचिन राम गोपाल वर्मांपर्यंत पोहोचला आणि त्याच्या पोस्टर बनवण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. 'निशब्द' हा सचिनला पहिला सिनेमा. या सिनेमानंतर त्याने राम गोपाळ वर्मांच्या अनेक सिनेमांचे पोस्टर बनवले. त्यानंतर सचिनची गाडी सुसाट सुटली. 

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनची पहिली चावडी भरणार

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वातील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हे पर्व चांगलचं गाजत आहे. आज या पर्वातील पहिली चावडी भरणार आहे. तसेच सदस्यांचे खरे चेहरेदेखील समोर येणार आहेत. 



R Madhavan: रणवीर सिंहसोबत फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यानं केलं ट्रोल; सडेतोड उत्तर देत आर.माधवन म्हणाला, 'भावा...'

R Madhavan: अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांसोबत कनेक्‍टेड असतात. काही नेटकरी सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल करतात तर काही त्यांचं कौतुक करतात. नुकतीच अभिनेता आर. माधवन (R Madhavan)  आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी  ‘एनबीए अबु दाबी गेम्‍स 2022’मध्ये हजेरी लावली. दोघांनी येथे एक सेल्फी काढला. हा सेल्फी आर. माधवननं सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर काहींनी त्याला ट्रोल केलं. ट्रोलर्सला नुकतच आर माधवननं सडेतोड उत्तर दिलं आहे. 



Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत फुलाला सुगंध मातीचा' पहिल्या क्रमांकावर

Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे. 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.





OTT : ओटीटीवर धमाका करण्यासाठी सुपरस्टार्स सज्ज

OTT Upcoming Projects : ओटीटीवर (OTT) गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या 'ताली' (Taali) पासून शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'फर्जी' (Farzi) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा समावेश आहे. 

Bigg Boss 16 : सलमान खानने घरातील सदस्यांना दिली पार्टी

Bigg Boss 16 Weekend ka Vaar : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन या कार्यक्रमात पहिला 'वीकेंड का वार' पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांसोबत छान वेळ घालवताना दिसून आला आहे. दरम्यान भाईजानने स्पर्धकांना काही सूचनादेखील दिल्या. 





Amruta Khanvilkar : चंद्रा म्हणून वेड लावल्यानंतर अमृता खानविलकर दिसणार ऐतिहासिक भूमिकेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा 'हर हर महादेव' या सिनेमातील सोनाबाई देशपांडे यांचा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवारी साडीतील अमृताचा पहिला लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे.





Happy Birthday Gauri Khan : इंटिरियर डिझायनर ते निर्माती असलेली गौरी खान कोट्यवधींची मालकीन

Happy Birthday Gauri Khan : गौरी खानचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. तिनेदिल्ली विद्यापीठा अंतर्गत असलेल्या लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. 2018 सालच्या 'फॉर्च्यून इंडिया' मॅगझिनच्या टॉप 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत गौरीच्या नावाचा समावेश आहे. आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खानकडे 7304 कोटी संपत्ती आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल


Om Raut On  Adipurush Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाच्या टीझरनंतर सैफच्या भूमिकेमुळे वादाला तोंड फुटलं आहे. याच वादावर ओम राऊत यानं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट उत्तर दिलं आहे. आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut)  एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो. मी सगळ्यांचं ऐकून घेतो आणि पुढे जातो. 95 सेकंदाच्या टीझरवरुन लोकं व्यक्त होत आहेत. जेव्हा पूर्ण फिल्म 12 जानेवारी रोजी रिलिज होईल त्यावेळी यामागे आमची काय इच्छा आहे हे आपल्याला कळेल.


रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!


दिवाळी येताच वेध लागतात ते लग्न सराईचे. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि मिश्कील विनोदाचे बादशहा विजय पाटकर (Vijay Patkar) वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यजमान कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी या सोहळ्याचा घाट घातला असून, मनोरंजनाची ट्रीट देण्यासाठी ते स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित मल्टीस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ (Varhadi Vajantri) हा चित्रपट घेऊन या लग्न सराईत अवतरणार आहेत. मनोरंजनाचा मोठा डोस असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मोशन पोस्टरद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली आहे.


Ameya Khopkar : 'आदिपुरुष'ला भाजपचा विरोध, मात्र मनसेचा पाठिंबा; 95 सेकंदांच्या टीझरवरुन मूल्यमापन करू नका, अमेय खोपकरांचा सल्ला


Ameya Khopkar On Adipurush : भाजपने 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. पण आता या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केलं आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. 


ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली काळाच्या पडद्याआड, 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे आज (7 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali Passes Away) यांनी आपल्या करिअरची सुरुवात 90च्या दशकात केली होती. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, 'केदारनाथ' आणि ‘पानिपत’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.