नाशिक : शहरातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) स्फोट (Blast) झाल्याने दोन अग्निवीरांचा (Agniveer) मृत्यू झाला आहे. सरावावेळी फायरिंग करत असताना स्फोट झाल्याने अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. काल दुपारी  आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांचा सराव सुरु होता. याच प्रशिक्षणादरम्यान फायरिंग करत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे आर्टिलरी सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. 


स्फोट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू


सराव सुरु असताना स्फोट झाल्याने यात दोन अग्निवीर गंभीर जखमी झाले. गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे या अग्निवीरांचे नाव आहे. मात्र आता या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


दरम्यान, भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. याअंतर्गत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मागील वर्षी दाखल झाले होते. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात 25 हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती करण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Kalyan Misfiring : बंदुक साफ करत असताना अचानक गोळी सुटली, कल्याणमध्ये नामांकित बिल्डरच्या हातातून आरपार गेली, मुलाच्या अंगावर काचा उडाल्या


Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं