Entertainment News Live Updates 8 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jul 2022 09:11 PM
Santosh Juvekar : संतोष जुवेकरने उघडली अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा; विद्यार्थ्यांना देणार अभिनयाचे धडे

Santosh Juvekar : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचं (Santosh Juvekar) स्वप्न साकार झालं आहे. संताषने ठाण्यात अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा उघडली आहे. 'ई दृश्यम फिल्म अॅन्ड एंटरटेनमेंट स्कूल' (E-Drishyam film and Entertainment school) असे संतोषच्या नव्या शाळेचे नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोषने यासंदर्भात माहिती दिली आहे. 





Ponniyin Selvan Teaser : 'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट; ऐश्वर्या रायचा राजेशाही लूक

Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. 


Man Udu Udu Zhala : प्रतीकच्या परवानगीने इंद्रा करणार दीपूसोबत लग्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या नव-नविन ट्विस्ट येत आहेत. इंद्राचं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर मालिकेत एक वेगळचं वळण आलं आहे. इंद्राने गुंडागिरी सोडून चांगल काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच प्रेक्षकांना इंद्रा-दीपूला लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. 

Shinzo Abe Death : शिंजो आबेंच्या निधनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक, केली भावनिक पोस्ट

Anupam Kher On Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता दिग्गजांकडून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे. 





Thor Love And Thunder : रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धुमाकूळ; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई

Thor Love And Thunder Day 1 Collection In India : हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 





Vikram Hospitalized : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली

Ponniyin Selvan Vikram Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमची (Vikram) प्रकृती खालावली आहे. त्याला चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

Pravin Tarde : प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित

मराठमोळे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रवीण तरडेंचे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) आणि 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हे दोन्ही सिनेमे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता या सिनेमांसाठी प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने (Shahir Dada Kondke Award) सन्मानित करण्यात आले आहे.





रणवीर सिंहला खावं लागणार झुरळ? बेयर ग्रील्सच्या शोमध्ये दिसणार जबरदस्त धमाका!

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता लवकरच बेयर ग्रील्सच्या शो मध्ये झळकणार आहे. या आधी या शोमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, आणि विक्की कौशल देखील या शोमध्ये झळकले होते. मात्र, यावेळी या शोमध्ये आणखी जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे. हा शो मागील सीझनपेक्षा वेगळा असणार आहे. या शोमध्ये आता रणवीर सिंहने नेमकं काय काय करावं, हे प्रेक्षक सांगणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

निमित्त आषाढी एकादशीचं, 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'विठ्ठला तूच तूच तू' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!

Vitthala Tuch : पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचे माहेरघर आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे आषाढी एकादशी दिवशी विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटली की, प्रथम डोळ्यासमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. विठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधत 'विठ्ठला तूच' या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या चित्रपटातील पहिले वहिले विठूरायाची वाहवा करणारे 'विठ्ठला तूच तूच तू' हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला आले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘बेबी डॉल में सोने दी...’, गोल्डन साडीत पलक तिवारीचा मनमोहक अंदाज!

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूड पदार्पणापूर्वीच पलक तिवारी आपल्या अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


 





‘होणाऱ्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’, आलिया भट्टकडून नीतू कपूर यांना खास बर्थडे विश!

Neetu Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज (8 जुलै) 64वा वाढदिवस साजरा करत आहे. याच खास निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकार त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात त्यांची सून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने देखील हटके अंदाज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच कपूर घराण्यात चिमुकला पाहुणा येणार आहे. आलिया गर्भवती असून, लवकरच आलिया आणि रणबीर कपूर आई-बाबा होणारा आहेत. हा खास मौका साधत आलियाने सासूबाईंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

लेकीसोबत प्रियांका चोप्राची भटकंती, फोटोंमध्ये दिसली मालतीची झलक!

Priyanka Chopra : बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. यावर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले. प्रियांका आणि निकने त्यांच्या लेकीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. मालती आता 6 महिन्यांची झाली आहे. मात्र, अजूनही प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. नुकतीच प्रियांका लेक मालतीसोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरताना दिसली.


वाचा संपूर्ण बातमी

निर्मात्यांनी तारक मेहता, दया अन् टप्पूचा शोध थांबवला? प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेतील अनेक पात्रांनी मालिकेला अलविदा केला आहे. यामुळे प्रेक्षक देखील मालिकेवर नाराज झाले आहेत. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. आता या मालिकेतील लोकप्रिय पात्र ‘तारक मेहता’, ‘दया भाभी’ आणि ‘टप्पू’ यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. या पात्रांसाठी निर्मात्यांनी नवीन कलाकारांचा शोध सुरु केल्याची चर्चा होती.


वाचा संपूर्ण बातमी

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये? करण जोहरच्या शोमधून मोठा गौप्यस्फोट!

Koffee With Karan 7 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’च्या (Koffee With Karan 7) सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमधून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड करत असतात. या शोच्या 7व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे दोघे हजेरी लावणार आहेत. या शोचे प्रोमो देखील प्रचंड चर्चेत आले आहेत. दरम्यान, शोच्या प्रमोशनवेळी करण जोहरने अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांच्या रिलेशशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, कपूर घराण्यात प्रवेश केल्यावर दिला स्टॉप! जाणून घ्या नीतू कपूरबद्दल...

Neetu Kapoor Birtdhay : लवकरच आजी होणार असलेल्या अभिनेत्री अर्थात बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज (8 जुलै) आपला 64वाढदिवस साजरा करत आहे. नीतू कपूर यांच्या जन्म 8 जुलै 1958मध्ये झाला. नीतू कपूर यांचे खरे नाव हरनीत कौर सिंह असे होते. लग्नानंतर त्या नीतू कपूर म्हणून प्रसिद्ध झाल्या. नीतू यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्या अनेक चित्रपटात झळकल्या. ‘दस लाख’, ‘वारिस’, ‘पवित्र पापी’ आणि ‘घर घर की कहानी’ अशा चित्रपटांमध्ये त्या बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


काली पोस्टर वादावर महुआ मोईत्रा यांनी केलेल्या वक्तव्याचं प्रकाश राज यांच्याकडून समर्थन; म्हणाले, 'रॉकस्टार...'


सध्या काली या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी वक्तव्य केलं होतं. महुआ मोईत्रा यांनी एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'मला अशा भारतात राहायचे नाही जिथे हिंदू धर्माबद्दल भाजपचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टीकोन प्रचलित असेल आणि बाकीचे लोक धर्माभोवती घुटमळतील.  मी मरेपर्यंत या विषयी लढा देईल. तुम्ही गुन्हा दाखल करा. मी कोणत्याही न्यायालयात लढा द्यायला तयार आहे.'  महुआ मोईत्रा यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी समर्थन केलं आहे.


Ashadhi Wari 2022 : चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती


Ashadhi Wari 2022 :  आषाढी एकादशी म्हटलं की, आपल्याला आठवते पंढरपूरच्या (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करणारी पंढरीची वारी आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील सर्वव्यापी आनंद सोहळाच. हा आनंद अधिक वृद्धिगंत करण्यासाठी झी टॉकीजने विठ्ठल रखुमाईची भव्य मूर्ती असलेला आकर्षक चित्ररथ वारी मार्गक्रमण करीत असलेल्या ठिकाणी नेत भाविकांना विट्ठल रखुमाईच्या अखंड दर्शनाचा लाभ उपलब्ध करून दिला. झी टॉकीजच्या या संकल्पनेला आणि चित्ररथाला भक्तांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.


अभिनेता श्रीजीत रवीला पोक्सो अॅक्ट अंतर्गत अटक; दोन अल्पवयीन मुलींनं केली होती तक्रार


मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith Ravi) याला दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सो या (POCSO) कमलाअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, एका काळ्या गाडीमध्ये एका व्यक्तीनं अश्लील चाळे केले, अशी तक्रार 4 जुलै रोजी 14 आणि 9 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींनी पोलिसांकडे केली. मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर त्रिशूर पश्चिम पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिस जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा कळले की, तो अभिनेता श्रीजीत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली.


'शमशेरा' मधील 'फितूर' गाणं रिलीज; रणबीर आणि वाणीचा रोमँटिक अंदाज


लवकरच शमशेरा  (Shamshera)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी शमशेरा चित्रपटामधील 'जी हुजूर' हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. शमशेरा या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील फितूर हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये रणबीर आणि वाणी यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.शमशेरामधील फितूर हे गाणं अरिजीत सिंह आणि नीती मोहन यांनी गायले आहे. 3 मिनीट 24 सेकंदाच्या या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मिथुननं या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.  वाणीनं या चित्रपटात सोना नावाच्या डान्सरची भूमिका साकारली आहे तर रणबीरनं या चित्रपटात डबल रोल साकारणार आहे. या दोघांची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा


प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. सध्या या स्वयंवरामध्ये मिकाला एक मुलगी आवडली आहे. स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये मिकासोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन अनेक सुंदर आणि हुशार मुली आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक मुलगी मिकाला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात मुली मिकावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पण, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे मिका सिंहला या कार्यक्रमामधील कोणती मुलगी सर्वात जास्त आवडते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.