Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : निर्मात्यांनी तारक मेहता, दया अन् टप्पूचा शोध थांबवला? प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेतील अनेक पात्रांनी मालिकेला अलविदा केला आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेतील अनेक पात्रांनी मालिकेला अलविदा केला आहे. यामुळे प्रेक्षक देखील मालिकेवर नाराज झाले आहेत. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. आता या मालिकेतील लोकप्रिय पात्र ‘तारक मेहता’, ‘दया भाभी’ आणि ‘टप्पू’ यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. या पात्रांसाठी निर्मात्यांनी नवीन कलाकारांचा शोध सुरु केल्याची चर्चा होती.
मात्र, आता ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी या पात्रांसाठी नवीन कलाकारांचा शोध थांबवल्याची चर्चा सुरु झाली आहे. मालिकेतही सध्या कथेचा नवा ट्रॅक पाहायला मिळत आहे. मालिकेत दया भाभी लवकरच परतणार अशी घोषणा निर्मात्यांनी केली होती. मालिकेत दयाच भाऊ सुंदर तिला दोन महिन्यांत घेऊन येईन असं म्हणाला होता. मात्र, आता त्याने ही वेळ दिवाळीपर्यंत टाळली आहे. त्यामुळे आता दयाभाभीचे कमबॅक लांबणीवर पडल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
‘टप्पू’ऐवजी नव्या पात्राची एन्ट्री!
मालिकेत गेल्या काही भागांपासून ‘टप्पू’ साकारणारा अभिनेता राज अंदकत दिसत नाहीये. मालिकेच्या कथेनुसार टप्पू हा पुढील शिक्षणासाठी आंध्रप्रदेशला गेला आहे. याचाच अर्थ पुढील काही महिने या मालिकेत टप्पू हे पात्र देखील दिसणार नाहीये. मात्र, सध्या मालिकेत ‘बिट्टू’ या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. आता हा बिट्टू किती दिवस टप्पूची जागा भरून काढणार हे लवकरच कळणार आहे. मात्र, टप्पू पुढील शिक्षणासाठी गेल्याने आता त्याची परत येण्याची शक्यताही कमी झाली आहे.
तर, दुसरीकडे तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी देखील गेल्या दीड महिन्यांपूर्वी या मालिकेला अलविदा केला आहे. ते मालिकेत दिसत नसले. तरी, अद्याप त्यांनी मालिका सोडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तर, मालिकेच्या शेवटाला अजूनही ते दिसत आल्याने प्रेक्षकही संभ्रमात आहेत. त्यामुळे या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.
हेही वाचा: