Alia Bhatt, Neetu Kapoor : ‘होणाऱ्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’, आलिया भट्टकडून नीतू कपूर यांना खास बर्थडे विश!
Neetu Kapoor Birthday : नीतू कपूर यांची सून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने देखील हटके अंदाज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Neetu Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज (8 जुलै) 64वा वाढदिवस साजरा करत आहे. याच खास निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकार त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात त्यांची सून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने देखील हटके अंदाज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच कपूर घराण्यात चिमुकला पाहुणा येणार आहे. आलिया गर्भवती असून, लवकरच आलिया आणि रणबीर कपूर आई-बाबा होणारा आहेत. हा खास मौका साधत आलियाने सासूबाईंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
‘माझ्या सासूबाई, मैत्रीण आणि होणाऱ्या आजीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...; असे तिने म्हटले आहे. यासोबतच तिने हळदीच्या कार्यक्रमातील एक फोटो शेअर केला आहे. यात नीतू कपूर आलियाचे लाड करताना दिसत आहेत.
पाहा पोस्ट:
नीतू कपूरन यांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवरून आलियाची ही स्टोरी शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नीतू यांनी लिहिले की, तुझ्यावर खूप प्रेम आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कपूर कुटुंबातील सर्व सदस्य सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
नीतू कपूर यांचे करिअर
नीतू कपूर यांच्या जन्म 8 जुलै 1958मध्ये झाला. नीतू कपूर यांचे खरे नाव हरनीत कौर सिंह असे होते. लग्नानंतर त्या नीतू कपूर म्हणून प्रसिद्ध झाल्या. नीतू यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्या अनेक चित्रपटात झळकल्या. ‘दस लाख’, ‘वारिस’, ‘पवित्र पापी’ आणि ‘घर घर की कहानी’ अशा चित्रपटांमध्ये त्या बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या.
वयाच्या 15व्या वर्षी त्या मुख्य अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. या चित्रपटाचे नाव होते ‘रिक्षावाला’. मात्र, यानंतर आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. यानंतर ‘हम किसीसे काम नही’ या चित्रपटातील ‘लेकर हम दिवाना दिल’ या गाण्यामुळे त्यांच्या करिअरला आणखी गती मिळाली. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.
हेही वाचा :
Neetu Kapoor : 'तू माझ्या सुनेच्या मागे का लागलाय?'; फोटोग्राफरच्या प्रश्नावर भडकल्या नीतू कपूर