अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात. या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छादूत म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाप्रसंगी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आजाराबाबतच्या माहिती पुस्तिकेचे अनावरणही याप्रसंगी करण्यात आले. तसेच केईएम रूग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्त विशेष पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित 'सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
एखाद्या संस्थेच्या इतिहासात 100 वर्षांचा कालावधी हा अतिशय मोठा कालावधी असतो. वेगाने बदलणार्या जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवा-सुविधाही अतिशय वेगाने बदलत आहेत. जनसेवेचे व्रत घेतलेल्या केईएम संस्थेच्या यशामध्ये आणखी 100 वर्षांची भर पडावी, अशा शुभेच्छा बॉलिवूड अमिताभ बच्चन यांनी याप्रसंगी दिल्या.
कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य वैद्यकीय सल्ला हा कोणत्याही आजारावर उपचारासाठी महत्वाचा ठरतो. अद्दयावत तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात अतिशय वेगाने वापर होतो आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकातील वैद्यकीय शल्यचिकित्सा क्षेत्रात झालेल्या बदलांबाबतही त्यांनी याप्रसंगी भाष्य केले.
गेल्या अनेक वर्षात सातत्याने वैद्यकीय क्षेत्राने आपल्याला कशा पद्धतीने जीवनदान दिले याबाबतच्या आठवणीही त्यांनी याप्रसंगी जागृत केल्या. कूली चित्रपटाच्या निमित्ताने अपघातात मिळालेले उपचार, टीबी आजाराच्या निमित्ताने मिळालेले उपचार, यकृताचा आजार याप्रसंगी योग्य उपचार मिळाल्याने आयुष्यमान वाढल्याचे श्रेय त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाला दिले.
आगामी काळातही जनसेवेचा वारसा केईएम रूग्णालयात शिक्षण घेणाऱ्या नव्या उमेदीच्या डॉक्टरांनी कायम ठेवावा, अशी अपेक्षाही बच्चन यांनी याप्रसंगी व्यक्त केली.