Happy Birthday Neetu Kapoor : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, कपूर घराण्यात प्रवेश केल्यावर दिला स्टॉप! जाणून घ्या नीतू कपूरबद्दल...
Neetu Kapoor Birtdhay : बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज (8 जुलै) आपला 64वाढदिवस साजरा करत आहे.
Neetu Kapoor Birtdhay : लवकरच आजी होणार असलेल्या अभिनेत्री अर्थात बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज (8 जुलै) आपला 64वाढदिवस साजरा करत आहे. नीतू कपूर यांच्या जन्म 8 जुलै 1958मध्ये झाला. नीतू कपूर यांचे खरे नाव हरनीत कौर सिंह असे होते. लग्नानंतर त्या नीतू कपूर म्हणून प्रसिद्ध झाल्या. नीतू यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्या अनेक चित्रपटात झळकल्या. ‘दस लाख’, ‘वारिस’, ‘पवित्र पापी’ आणि ‘घर घर की कहानी’ अशा चित्रपटांमध्ये त्या बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या.
वयाच्या 15व्या वर्षी त्या मुख्य अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. या चित्रपटाचे नाव होते ‘रिक्षावाला’. मात्र, यानंतर आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. यानंतर ‘हम किसीसे काम नही’ या चित्रपटातील ‘लेकर हम दिवाना दिल’ या गाण्यामुळे त्यांच्या करिअरला आणखी गती मिळाली. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. 1975मध्ये नीतू आणि ऋषी कपूर यांनी पहिला एकत्र चित्रपट केला. या चित्रपटाचं नाव होतं ‘खेल खेल में’.
ऋषी कपूरसोबत जमली जोडी!
‘खेल खेल में’नंतर ऋषी कपूर आणि नीतू यानी 10पेक्षा अधिक चित्रपट हिट दिले. दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर गाजू लागली होती. दुसरीकडे खऱ्या आयुष्यातही दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं होतं. या काळात दोघेही आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होते. असे असतानाही 22 जानेवारी 1980मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले आणि मनोरंजन विश्वाला सुखद धक्का दिला. लग्नानंतर नीतू सिंह ‘नीतू कपूर’ झाल्या. कपूर घराण्यात आल्यावर त्यांनी मनोरंजन विश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या संसारात रमल्या. या काळात करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी कुटुंबांसाठी मनोरंजन विश्वाला गुडबाय केला. मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीर कपूर यांच्या जन्मानंतर त्या त्यांना लहानाचं मोठं करण्यात व्यस्त राहिल्या. दरम्यान, लग्नानंतर त्यांनी जे चित्रपट केले, ते केवळ ऋषी कपूर यांच्यासोबतच होते. ऋषी कपूर यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत नीतू त्यांच्याजवळ होत्या. ऋषी कपूर हे जग सोडून गेल्यानंतर त्या कोलमडून गेल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एका त्यांनी चित्रपटांमध्ये आपले मन रमवण्यास सुरुवात केली आहे. नुकताच त्यांचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हेही वाचा :
Neetu Kapoor : 'तू माझ्या सुनेच्या मागे का लागलाय?'; फोटोग्राफरच्या प्रश्नावर भडकल्या नीतू कपूर