Priyanka Chopra : लेकीसोबत प्रियांका चोप्राची भटकंती, फोटोंमध्ये दिसली मालतीची झलक!
Priyanka Chopra : बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे.
Priyanka Chopra : बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. यावर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले. प्रियांका आणि निकने त्यांच्या लेकीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. मालती आता 6 महिन्यांची झाली आहे. मात्र, अजूनही प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. नुकतीच प्रियांका लेक मालतीसोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरताना दिसली.
स्वतः प्रियांका चोप्राने आपले आणि मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांकाचा ग्लॅमरस मॉमी अवतार दिसत आहे. तर, मालती देखील आपल्या आईप्रमाणे कूल स्टाईलमध्ये दिसत आहे. मात्र, या फोटोतही प्रियांकाने आपल्या लेकीचा चेहरा लपवला आहे. मात्र, प्रियांकाच्या लेकीची झलक दिसल्याने चाहते खुश झाले आहेत.
पाहा फोटो :
प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीसोबतचा एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियांका एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. फोटोमध्ये प्रियांकाने आपल्या मुलीला उचलून घेतले आहे आणि कॅमेऱ्यासाठी फोटो पोज देत आहे. मात्र, अभिनेत्रीने आपल्या लेकीचा चेहरा लपवला आहे. मालती निळ्या रंगाची टोपी आणि फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर डेनिम शॉर्ट, व्हाईट टॉप आणि ब्लॅक शूजमध्ये प्रियांकाही खूपच स्टायलिश दिसत आहे.
प्रियांका कामात व्यस्त!
प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका गेले काही दिवस या सीरिजचे शूटिंग करत आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच, प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच, कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
हेही वाचा :
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर