लातूर : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना अचानक आग लागली आणि त्यात दोन् स्कूल व्हॅन जुळून खाक झाल्या. दिलीप साळुंखे यांच्या मालकीच्या या दोन्ही स्कूल व्हॅन आहेत. या आगीत दिलीप साळुंखे, त्याची पत्नी आणि सहा वर्षाची मुलगी या घटनेत भाजले आहेत. त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
लातूर शहरातील न्यू भाग्यनगर भागात दिलीप साळुंखे या व्यक्तीचे घर आहे. दोन स्कूल व्हॅन त्यांच्याकडे आहेत. सोमवारी रात्री या व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना अचानक आग लागली. आग अतिशय भयानक होती. आग मोठ्या प्रमाणात पेटल्याने दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
दिलीप साळुंखे यांच्या घरात आगीचा लोट पोचल्याने काचा तडकल्या. आग लागल्या कारणाने टायरचे स्फोट झाले. दिलीप साळुंखे यांची पत्नी आणि सहा वर्षाची मुलगी या आगीत भाजले आहेत. दिलीप साळुंखे हेदेखील यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजलं आहे. आजूबाजूच्या लोकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आग लागल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता.
घरातच भरण्यात येत होता गॅस
या दोन स्कूल व्हॅनमध्ये घरामध्येच गॅस भरण्यात येत होता. त्यातूनच ही घटना घडली आहे. घरातच अशा पद्धतीने गॅस भरताना झालेल्या चुकीमुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते असलेल्या या भागात अशा प्रकारच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असती.
तरुणांचे धाडस
या घरात आग लागल्याची माहिती आजूबाजूच्या तरुणांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलास फोन करणे, आगीत अडकले यांना बाहेर काढणे, आग विझविण्यासाठी प्रयत्न करणे, आगीत भाजलेल्या साळुंखे कुटुंबीयांना तात्काळ दवाखान्यात दाखल करणे अशी सर्व जोखमीची कामे या तरुणांनी केली.
ही बातमी वाचा: