एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 7 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 7 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

‘जगा आणि जगू द्या...’, ‘लायगर’ फ्लॉप होताच निर्माती चार्मी कौरने पोस्ट लिहित सोशल मीडियावरून घेतला ब्रेक!

'लायगर' बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर करण जोहर आणि चार्मी कौर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, चार्मी कौरने आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. करण जोहरने ‘लायगर’ची निर्मिती केली होती. करण जोहर व्यतिरिक्त तेलुगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री चार्मी कौर हिने देखील या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती.

कमाल खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; लैंगिक छळाचा आरोप

वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खानला (Kamaal R Khan) वर्सोवा पोलिसांनी तीन वर्षापूर्वीच्या प्रकरणी अटक केली आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कमाल आर खानला शनिवारी (3 सप्टेंबर) अटक करण्यात आली आणि रविवारी (4 सप्टेंबर) वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले.

सलमानच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर; लूकनं वेधलं लक्ष

सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव 'किसी का भाई किसी की जान' असं आहे. या चित्रपटातील सलमानचा लूक देखील रिव्हिल करण्यात आला आहे. लांब केस, डोळ्यावर गॉगल अशा  डॅशिंग लूकमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खान फिल्म्स या नावाच्या युट्युब चॅनलवरुन 'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटातील सलमानच्या लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.

सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा

बहुचर्चित असलेल्या सेक्रेड गेम्स (sacred games) या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेला (rajshri deshpande) आपण आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिले आहे. मात्र अभिनयाच्या पलीकडे राजश्री करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची देखील अनेकदा चर्चा होते. तिच्या अशाच एका सामाजिक उपक्रमांने सर्वांचे मनं जिंकले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे (zp School) लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.

22:42 PM (IST)  •  07 Sep 2022

Box Office : ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘विक्रम वेधा’ बॉलिवूडला तारणार?

Box Office : 'ब्रह्मास्त्र' आणि  'विक्रम वेधा' बॉलिवूडला तारणार? सध्या हाच प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागला आहे. आणि याचं कारण आहे गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होणारे बिग बजेट हिंदी सिनेमे. तर दुसरीकडे दक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींच्या उड्या मारू लागलेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर दक्षिणेतील सिनेमांचं आक्रमण होत असताना मोठं वादळ घोंघावत असताना 'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा' काहीशी आशा घेऊन समोर येत आहेत. चांगला कंटेंट असेल तर प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतातच. 'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा'चा कंटेंट चांगला दिसत आहे. त्यामुळेच हे दोन्ही सिनेमे बॉलिवूडला तारणार का असा प्रश्न सध्या पडत आहे.

21:34 PM (IST)  •  07 Sep 2022

KRK Gets Bail : वादग्रस्त ट्वीटमुळे अटकेत असलेल्या कमाल आर खानला जामीन

Kamaal R Khan : वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे असणाऱ्या कमाल आर खानला (Kamaal R Khan) आता जामीन मिळाला आहे. चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण तीन वर्षापूर्वीचं आहे. आता जामिन मिळाला असला तरी तरी केआरकेला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 

21:33 PM (IST)  •  07 Sep 2022

IMDB Rating : आयएमडीबीच्या शर्यतीत 'डार्लिंग्स' पहिल्या क्रमांकावर

डार्लिंग्स हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. आलियासह शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मैथ्यू आणि राजेश शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होती. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 

16:34 PM (IST)  •  07 Sep 2022

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत परीसमोर आलं अविनाशचं सत्य

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीस्ट येत असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत परीसमोर अविनाशचं सत्य आलं आहे. 

16:17 PM (IST)  •  07 Sep 2022

Justin Bieber : जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर केली रद्द

हॉलिवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बीरचे (Justin Bieber) चाहते जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबर आजाराशी झुंज देत असल्याने चर्चेत आला होता. पण आता जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Beed News : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
Ratan Tata Dog : दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP MajhaNavi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची भारतीय वायु दलातर्फे चाचणीSanjay Raut Full PC : सगळे मिस्टर फॉर्टी परसेंट आहेत; राज्याला लुटा आणि दिल्लीत पाठवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Beed News : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
Ratan Tata Dog : दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
Jayant Patil on Mahayuti : बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी, नाशिकमध्ये खळबळ
कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी
Abhijit Patil : पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
Embed widget