एक्स्प्लोर

मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!

मध्यंतरी आपण या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे या संदर्भात प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्हीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते प्रयत्न थांबवले होते, असे मिटकरी म्हणाले.

Ajit Pawar and Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं,  असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा केलं आहे. प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आणि वैचारिक वारसदार, तर अजित दादा शिव-शाहू फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वैचारिक वारसदार असल्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही नेते एकत्र येण्यासाठी प्रयत्न सोडणार नाही

अमोल मिटकरी म्हणाले की, मध्यंतरी आपण या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे या संदर्भात प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्हीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते प्रयत्न थांबवले होते. आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही नेते एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सोडणार नाही, असे मिटकरी म्हणाले. दुसरीकडे, 13 ऑक्टोबर रोजी अकोला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित अकोल्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकरांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागल्याने चर्चा रंगली आहे. 

अजितदादा कुठेही नाराज नाहीत

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उठून गेल्याची चर्चा होती. यावर ते म्हणाले की, अजितदादा कुठेही नाराज नाहीत. महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जातात. मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेले काही अधिकारी माध्यमांना अशा बातम्या देतात. 

मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे

ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघातील जनतेचा आपल्यावर उमेदवारीसाठी दबाव आणि आग्रह आहे. सध्याच्या भाजप आमदारांबद्दल लोकमानसामध्ये नाराजीची भावना असल्याची जनतेची माहिती आहे. अकोट ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे. याबद्दल पक्षाध्यक्ष अजित दादांकडे म्हणनं मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget