एक्स्प्लोर

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

Bopdev Ghat Incident: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असल्याची चर्चा आहे. येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत.

पुणे:  बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांना अखेर यश आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन पैकी एका तरुणाला अटक केलेली असून इतर दोन जणांचा कसून शोध घेतला जातो आहे. सीसीटीव्हीची मदत घेऊन पीडित तरुणांच्या मित्राला जेव्हा सीसीटीव्ही दाखवण्यात आला तेव्हा त्याने हाच आरोपी असल्याचे सांगितले आणि यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केलेली असून इतर दोन जणांच्या पोलीस सध्या शोध घेत आहेत. मात्र, पुणे पोलिसांकडून या संपूर्ण घटनेबद्दल गोपनीयता  बाळगण्यात असल्यामुळे अधिकृतपणे कुठलाही वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात अद्याप बोलायला तयार नाहीत. (Bopdev Ghat Incident) पुणे पोलिसांनी मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी मोठी एक अपडेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bopdev Ghat Incident)

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट फिरत असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आल आहे. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे. 

प्रकरणात सराईतांची चौकशी

पोलिसांकडून आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या 70 ते 80 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात नऊ दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाही मागमूस लागत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शहर पोलिसांच्या तब्ब्ल 60 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध

या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर,संपर्क क्रमांक : 8691999689 पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री.युवराज हांडे संपर्क क्रमांक : 8275200947 /9307545045 किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880 यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Embed widget