Entertainment News Live Updates 6 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर उलगडणार सई ताम्हणकरच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल सहभागी होणार आहेत.
'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'च्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात
सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि आमिर खान चर्चेत आहेत. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षयचा 'रक्षा बंधन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमांच्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात झाली आहे.
'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
'धर्मवीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
ब्रेकअपनंतर राकेश-शमिताचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीमुळे शमिता आणि राकेश चर्चेत आले होते. आता ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'तेरे विच रब दिसदा' असे या गाण्याचे नाव आहे.
‘रक्षा बंधन’च्या प्रमोशनसाठी आलेल्या अक्षय कुमारलाही आवरला नाही मिसळ चाखण्याचा मोह!
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार सध्या अनेक शहरांत दौरे करत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाची टीम पुण्यात आली होती. प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने चक्क पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला होता. अक्षय कुमारचा मिसळ चाखतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IFFM : 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्टपासून होणार सुरू
IFFM : 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' (IFFM) हा भारताबाहेर आयोजित होणार सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल आहे. या महोत्सवात समीक्षकांची पसंती मिळालेले 100 हून अधिक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतात. 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तसेच या महोत्सवात 'माली'चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' 'या' दिवशीपासून होणार सुरू
Bigg Boss 16 Premier Date : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. गेली 15 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) प्रीमियर होणार आहे. बिग बॉसचे 16 वे पर्व सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 1 ऑक्टोबर 2022 रोजी कलर्स चॅनलवर या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. निर्माते लवकरच अधिकृतरित्या यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत.
Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांची मागील तीन तासापासून चौकशी सुरू
Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांची मागील तीन तासापासून चौकशी सुरू आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा पत्राचाळ प्रकरणात, तसेच अलिबाग येथे जागा घेतल्याचा आरोप असल्यानं चौकशी सुरू आहे. तसेच, शिवसेना खासदार आणि वर्षा राऊत यांचे पती संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. अलिबाग येथे जागा खरेदी करताना रोखीने व्यवहार झाले असल्याचा ईडीनं आरोप केला आहे. वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त पैसे आले आहेत. त्यासंदर्भात ही चौकशी केली जात आहे.
Ghatkopar : घाटकोपरच्या पंत नगरमध्ये इमारतीच्या संरक्षक भिंत शेजारी असलेल्या निर्माणाधीन भाग कोसळला
Ghatkopar : घाटकोपरच्या पंत नगरमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत शेजारी असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या पायावर कोसळला आहे. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशांनी केल्या. तसंच प्रशासनानं याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केलेय.
मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध एफआयआर दाखल!
मनोरंजन विश्वात आपले नशीब आजमवण्यासाठी आलेल्या एका अभिनेत्री-मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध (Jignesh Mehta) अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai | FIR registered against stock broker Jignesh Mehta at MIDC PS for allegedly molesting a model. IPC Sections 354 (assault or criminal force to woman with intent to outrage her modesty), 354B & 506 (criminal intimidation) invoked. He will be produced before the Court today.
— ANI (@ANI) August 6, 2022