एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 5 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 5 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

C Ramchandra Death Anniversary: अभिनेता व्हायचं होतं झाले संगीतकार, 800 पेक्षा जास्त गाणी संगीतबद्ध; जाणून घ्या सी. रामचंद्र यांचा प्रवास...

C Ramchandra : संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (C Ramchandra) यांनी अनेक गाणी गायली आहेत. संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कायमच झळाळती राहिली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी 120 हिंदी, सात मराठी, पाच तामिळ, तीन तेलुगु आणि एका भोजपुरी बोलपटात त्यांनी आठशेहून अधिक गाणी संगीतबद्ध केली. त्यात 35 हून अधिक गाणी त्यांनी स्वत: गायली आहेत. संगीतदिग्दर्शक आणि पार्श्वगायक रामचंद्र नरहर चितळकर हे 'सी. रामचंद्र' या नावाने हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय होते. तसेच त्यांना 'अण्णा' असेही म्हटले जात. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. 

Vaalvi Trailer : दिसतं तसं नसतं... 'वाळवी'चा रहस्यमय ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Vaalvi Trailer Out : 'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' (Vaalvi) 
या सिनेमात  पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता 'वाळवी'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं शूटिंग कसं झालं? जाणून घ्या एकाचवेळी कसं जमवलं अभिनय अन् दिग्दर्शन...

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)

आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".

14:45 PM (IST)  •  05 Jan 2023

Tunisha Sharma : 'जेव्हा कोणी माझ्याबरोबर नसताना तुम्ही उभे राहाल'; शिझानच्या आईबरोबर तुनिषाचे चॅट व्हायरल

Tunisha Sharma : 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता तुनिषा शर्माने शीजानच्या आईला मेसेज केला की ती झोपली आहे का? ज्याचे उत्तर आले नाही. त्यानंतर तुनिषाने पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी मेसेज केला. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की,

हे चॅट 12 ऑक्टोबरचे आहेत. ज्यामध्ये तुनिषाने शिझानच्या आईला मेसेज केला आहे की, 'जेव्हा कोणीही माझ्याबरोबर उभे नाही, तेव्हा मला माहित आहे की तुम्ही किंवा आपी (शिझानची बहिण) नेहमीच उभे राहतील. मी तुम्हा दोघींवर खूप प्रेम करते. काळजी करू नका सर्व काही ठीक होईल. मी तुमच्याबरोबर आहे. या मेसेजला उत्तर देताना शिझानची आई लिहिते की, 'बेटा तू नेहमी आनंदी राहा, तुझी तब्येत चांगली राहो, फक्त आमेन.' तुनिषा आणि शिझानच्या आईची ही चॅट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

13:36 PM (IST)  •  05 Jan 2023

Pathaan: पठाण चित्रपटामधील काही दृश्यांना कात्री; सेन्सॉरच्या सूचनेनंतर बदलले 'हे' शब्द

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट काही दिनवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पठाण चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटामधील गाण्यामध्ये आणि डायलॉग्समध्ये बदल करण्यात आले आहेत. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

13:34 PM (IST)  •  05 Jan 2023

Date Bhet: प्रेमाच्या महिन्यात आता होणार 'डेट भेट'; 24  फेब्रुवारीला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Date Bhet:  अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत  'डेट भेट' (Date Bhet) या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले. सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'डेट भेट' 24  फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

10:54 AM (IST)  •  05 Jan 2023

Sonu Sood: 'असं करु नका', सोनू सूदच्या व्हिडीओला रेल्वे प्रसाशनाचा रिप्लाय; अभिनेत्यानं मागितली माफी

Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोनू हा वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. काही दिवसांपूर्वी सोनू सूदनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आता उत्तर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाच्या या रिप्लायनंतर सोनूला माफी मागावी लागली. 

09:09 AM (IST)  •  05 Jan 2023

Varisu Trailer:  अॅक्शन आणि रोमान्सचा तडका; विजय अन् रश्मिकाच्या 'वरिसु' चा ट्रेलर रिलीज

Varisu Trailer:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काल (4 जानेवारी) विजयच्या वरिसु (Varisu) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget