Entertainment News Live Updates 4 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2022 04:32 PM
Neel Salekar : 'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट

Neel Salekar : सोशल मीडियावरील (Social Media) स्टार असणारा नील सालेकर (Neel Salekar) हा इन्स्टाग्रामवर नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळा कंटेन्ट घेऊन येत असतो. त्या नीलचं एक भन्नाट गाणं रिलीज झालं आहे.


अनुपम खेर यांनी घेतली एस.एस राजामौली यांची भेट

'केसरिया' नंतर ब्रह्मास्त्रमधील 'देवा देवा' गाणं होणार रिलीज; पाहा टीझर

Deva Deva Song Teaser :  प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा  'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) हे गाणं 17 जुलै रोजी रिलीज झालं. आता या चित्रपटामधील 'देवा देवा' (Deva Deva) या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर, आलियाला आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे दिसत आहेत. 


Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार?  हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की. 


 पाहा पोस्टर



उर्फी जावेदनं शेअर केले हॉ लूकमधील फोटो

Mithilesh Chaturvedi : मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचं काल (3 ऑगस्ट) लखनऊ येथे निधन झालं.

Mithilesh Chaturvedi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचं काल (3 ऑगस्ट) लखनऊ येथे निधन झालं. रिपोर्टनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली. 


आशिष यांची पोस्ट


Criminal Justice 3 Teaser : पंकज त्रिपाठीच्या 'क्रिमिनल जस्टिस 3'चा टीझर आऊट

Criminal Justice 3 Teaser Released : ओटीटी (Ott) विश्वात पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) नाव आदराने घेतले जाते. अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये पंकजने काम केलं आहे. पंकजची 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice) ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. 

Mi Punha Yein : सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार? ‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Mi Punha Yein : प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) वेबसीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही 5 अॅागस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

राजभवनात घुमले सावरकरांच्या 'कालजयी' विचारांचे सूर!

Kaljayi Savarkar : मान्यवर निमंत्रितांच्या गर्दीने फुलून गेलेले राजभवनातील 'जल विहार' सभागृह... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लघुपट सुरु होण्याआधी असलेले उत्सुकतेचे भाव आणि लघुपट संपल्यानंतर एकंदरीतच सभागृहात तयार झालेले भारावलेले वातावरण.... हे वर्णन आहे राजभवन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'कालजयी सावरकर' (Kaljayi Savarkar) या लघुपटाच्या विशेष 'प्रिव्हियू' शो दरम्यानचे! राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेक समूह निर्मित 'कालजयी सावरकर' या लघुपटाचा विशेष प्रिव्हियू शो नुकताच संपन्न झाला. यावेळी भारतीय विचार दर्शन संस्थेचे अध्यक्ष सुश्रुत चितळे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


सावरकरांचे केवळ चरित्र लघुपटातून न मांडता त्यांचे विचार प्रामुख्याने प्रेक्षकांपर्यंत या लघुपटातून पोचवण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वच निमंत्रितांनी लघुपट पाहिल्यानंतर दिली. आजच्या नव्या भारताचे विचार हे खऱ्या अर्थाने कसे सावरकरांनी मांडलेल्या विचारांशी सुसंगत आहेत. एकप्रकारे आज देशाच्या विकासाचा रथ कशा पद्धतीने जाणते - अजाणतेपणे सावरकरांचे विचार पुढे घेऊन चालला आहे, या मुद्यांना लघुपट स्पर्श करत असल्याचे मत अनेकांनी नोंदवले.


वाचा संपूर्ण बातमी

ठरलं! ‘या’ दिवशी प्रियांका चोप्रा चाहत्यांना दाखवणार लेकीचा चेहरा!

Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी निक (Nick Jonas) आणि प्रियांकाने आपल्या लेकीचे स्वागत केले होते. आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. प्रियांका नेहमी आपल्या लेकीची झलक सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, तिने कधीच आपल्या लेकीचा चेहरा रिव्हील केला नाही. आता तिची आई मधु चोप्राने (Madhu Chopra) यांनी याविषयी एक मोठं विधान केलं.


प्रियांका चोप्राच्या आईने अर्थात मधु चोप्रा यांनी प्रियांका तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार हे सांगितले आहे. ‘मदर्स डे 2022’च्या निमित्ताने, प्रियांकाने तिच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.


वाचा संपूर्ण बातमी

Ek Villain Returns : रिलीज होऊन पाच दिवस झाले, तरी पन्नास कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला नाही 'एक व्हिलेन रिटर्न्स'; पाहा कलेक्शन

Ek Villain Returns Box Office Collection Day 5 : मोहित सुरीनं (Mohit Suri) दिग्दर्शित केलेल्या एक व्हिलेन रिटर्न्स (Ek Villain Returns) या चित्रपटाला प्रेक्षकांची फरशी पसंती मिळत नाहीये, असं दिसत आहे. कारण हा चित्रपट ऑडियन्सला इंम्प्रेस करु शकला नाही. एक व्हिलन रिटर्न्समध्ये जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पाटनी (Disha Patani) या कलाकारांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी रिलीज झाला होता. वीकेंडला या चित्रपटानं चांगली कमाई केली पण त्यानंतर मात्र या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Darlings Song : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' (Darlings) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आलिया सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. आलियाचा हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी आज 'डार्लिंग्स' चित्रपटातील 'ला इलाज' (La Ilaaj) हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे रिलीज होताच त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘ला इलाज’ हे गाणे खूप पसंत केले जात आहे. हे गाणे अरिजित सिंहने गायले असून, गीतकार गुलजार यांनी लिहिले आहे.


आलिया भट्टने साकारलेल्या आयुष्याचा प्रवास ‘ला इलाज’ या गाण्यात दाखवण्यात आला आहे. या स्लो रोमँटिक गाण्यात आलिया भट्ट आणि अभिनेता विजय वर्मा यांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळते. गाण्यात चित्रपटातील फक्त दृश्यांचा समावेश करण्यात आला आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर हे गाणे शेअर केले आहे.


 



सुबोध भावेची फेसबुक पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण...'

Subodh Bhave : पुण्यातील  (Pune) एका कार्यक्रमात बोलत असताना केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा सध्या चर्चेत आहे. आपण शिक्षण घेतो, नोकरी शोधतो, उत्तम काम करतो मात्र लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश दिला आहे, अशी टीका यावेळी सुबोधनं केली होती. पण आता या कार्यक्रमातील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ शेअर करुन सुबोधनं त्याच्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिलं आहे. 


 वाचा सविस्तर बातमी

समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात!

Naga Chaitanya : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) ऑक्टोबर 2021मध्ये वेगळे झाले. या जोडप्याने आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर याची घोषणा केली होती. यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नागा चैतन्यच्या आयुष्यात आता एक नवी व्यक्ती आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सध्या अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala)  डेट करत आहे. आपल्या अफेअरच्या चर्चेवर एका मुलाखतीदरम्यान नागाने शिक्कामोर्तब केले आहे.


नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यने त्याच्या आणि शोभिता यांच्यातील नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. मुलाखतीदरम्यान जेव्हा या अभिनेत्रीचे नाव समोर आले, तेव्हा नागा याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मात्र, प्रश्न टाळत त्याने नुसतेच हसण्यावारी नेले. एक महिन्यापूर्वी नागा चैतन्य शोभिताला त्याचे नवे घर दाखवताना दिसल्याचे म्हटले होते. रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, दोघे एकमेकांसोबत अतिशय मोकळेपणाने वावरताना दिसले होते.


वाचा संपूर्ण बातमी

आमिर खाननंतर आता अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर बंदी घालण्याची मागणी! नेमकं कारण काय?

Raksha Bandhan Boycott: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan) चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत. एकीकडे आमिर खान आणि करीना कपूरच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे, रिलीजच्या अवघ्या एक आठवडा आधी, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि भूमी पेडणेकरचा (Bhumi Pednekar) 'रक्षा बंधन' चित्रपटही वादात अडकला आहे. आता अक्षयच्या या चित्रपटावरही बंदी घालण्याची मागणी होत आहे. बॉयकॉट 'लाल सिंह चड्ढा'नंतर आता ‘बॉयकॉट रक्षाबंधन’ अशी मागणी नेटकरी करत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

‘आम्ही आजही एक परिवार’, घटस्फोटानंतर किरण रावसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

Koffee With Karan 7: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान चित्रपटाची ही जोडी करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये (Koffee With Karan 7) सहभागी होणार आहे. या शोमधील त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये त्याने आपल्या आणि किरणच्या (Kiran Rao) नात्यावरही भाष्य केले आहे. आमिरने गेल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये किरण रावपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती.


आमिरच्या घटस्फोटाच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघेही पती-पत्नी म्हणून वेगळे झाले असले, तरी आई-वडील म्हणून दोघेही एकत्र आहेत. दोघांनाही आपल्या मुलाच्या संगोपनात कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही. मुलगा आझादला दोघांचेही प्रेम मिळावे, यासाठी दोघेही प्रयत्न करतात. करणच्या या शोमध्ये आमिरने त्याच्या आणि पूर्व पत्नी किरण राव व रीना दत्ता यांच्यासोबतच्या नात्याविषयी चर्चा केली.


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Sunil Grover : ‘गुत्थी’ ते ‘डॉक्टर गुलाटी’ बनून प्रेक्षकांना हसवणारा सुनील ग्रोव्हर

Sunil Grover Birthday : आपल्या दमदार कॉमेडीने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेता सुनील ग्रोव्हरचा (Sunil Grover) जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणामध्ये झाला. सुनील ग्रोव्हर हा एक उत्तम विनोदी अभिनेता आहे. चित्रपटांमधील आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी त्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बालपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. पुढे जाऊन याच क्षेत्रात करिअर करायचे हे त्याने मनाशी पक्के केले होते. त्याने शालेय जीवनापासूनच नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती.


'द कपिल शर्मा शो'मधून घराघरांत पोहोचलेल्या सुनीलला कॉमेडीशिवाय गंभीर भूमिकांमध्येही खूप पसंत केले जाते. सुनील ग्रोव्हर आजघडीला टीव्हीपासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत एक प्रसिद्ध नाव बनले आहे, पण यामागे त्याची अनेक वर्षांची मेहनत दडलेली आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'टाइमपास 3'ची कमाल; चार दिवसांत कमवला 4.36 कोटींचा गल्ला


'टाइमपास' आणि 'टाइमपास 2'च्या यशानंतर आता 'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. नुकतेच या सिनेमाचे कलेक्शन समोर आले आहे. या सिनेमाने 4.36 कोटींची कमाई केली आहे.


'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


'शेर शिवराज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.


बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होत असताना सिनेमावर बहिष्कार मागणी होत आहे. अशातच या सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.


गजेंद्र अहिरेंची 'साजिंदे' वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीस


दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतल बाईपण प्रभावीपणे मांडणार संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असत त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे.  चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते तीच धडपड एक कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि 'साजिंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली.


मराठी रॅपर ‘किंग जेडी’कडून ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना


मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव  उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.