Naga Chaitanya : समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात! ‘या’ अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर केला शिक्कामोर्तब?
Naga Chaitanya : नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यने त्याच्या आणि शोभिता यांच्यातील नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.
![Naga Chaitanya : समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात! ‘या’ अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर केला शिक्कामोर्तब? Naga Chaitanya confirms his relationship with Sobhita Dhulipala Naga Chaitanya : समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात! ‘या’ अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर केला शिक्कामोर्तब?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/16db4a293df09c9325fb71a5868945f31659498287_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Naga Chaitanya : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) ऑक्टोबर 2021मध्ये वेगळे झाले. या जोडप्याने आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर याची घोषणा केली होती. यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नागा चैतन्यच्या आयुष्यात आता एक नवी व्यक्ती आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सध्या अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) डेट करत आहे. आपल्या अफेअरच्या चर्चेवर एका मुलाखतीदरम्यान नागाने शिक्कामोर्तब केले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यने त्याच्या आणि शोभिता यांच्यातील नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. मुलाखतीदरम्यान जेव्हा या अभिनेत्रीचे नाव समोर आले, तेव्हा नागा याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मात्र, प्रश्न टाळत त्याने नुसतेच हसण्यावारी नेले. एक महिन्यापूर्वी नागा चैतन्य शोभिताला त्याचे नवे घर दाखवताना दिसल्याचे म्हटले होते. रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, दोघे एकमेकांसोबत अतिशय मोकळेपणाने वावरताना दिसले होते.
कतरिना कैफवर क्रश!
नागाने या मुलाखतीत पुढे सांगितले की, कतरिना कैफ त्याची क्रश आहे. नागा म्हणाला की, ‘ती सुंदर आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात अतिशय छोट्या भूमिकांमधून केली होती आणि आज ती यशाच्या उंचीवर आहे. तिचा हा प्रवास आम्ही पाहिला आहे. अभिनेत्री असण्यासोबतच कतरिनाने स्वतःला एक डान्सर म्हणूनही विकसित केले आहे.’
शोभिता आणि नागाच्या नात्याची चर्चा
नुकताच नागा चैत्यन्य याने हैदराबादमधील जुबली हिल्सवर नवीन घर खरेदी केले आहे. मात्र, सध्या येथे काम सुरू आहे. या नवीन घरात चैतन्य आणि शोभिता सतत एकत्र फेर फटका मारताना दिसत आहेत. चैतन्यने तिला आपले संपूर्ण घर दाखवले आहे. काही तास एकत्र घालवल्यानंतर दोघेही एकाच गाडीतून निघून गेले. याशिवाय शोभिता तिच्या ‘मेजर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये चैतन्यला अनेकवेळा दिसला होता. शोभितानेही तिचा वाढदिवसही हैदराबादमध्येच साजरा केला होता. यामुळे आता त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
समंथा आणि नागाचा घटस्फोट
नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोट घेण्यापूर्वीही दोघांबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले गेले होते. मात्र, दोघांनीही याबाबत नेहमी मौन बाळगले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही फॅमिली कोर्टात समुपदेशन केले होते. पण, समुपदेशन झाल्यानंतरही समंथा आणि चैतन्यने आपला निर्णय बदलला नाही.
समंथा आणि नागा चैतन्य यांनी गोव्यात 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)