Entertainment News Live Updates 29 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली...
Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या शालीन भानोट आणि सुंबूल तौकीर खान (Sumbul Touqeer) यांच्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. सीझनच्या पहिल्या आठवड्यातच सुंबूल आणि शालीनच्या नात्यावर सर्वांनी संशय घेतला होता. वीकेंडच्या वारमध्ये तर सुंबलच्या वडिलांनीदेखील शालीनपासून दूर राहण्याची चेतावनी दिली. मात्र, सुंबूलने शालीनशी मैत्री तोडली नाही. सुंबूल शालीनबाबत खूप पझेसिव्ह झाली आहे यासाठी तिला अनेकदा सुनावले देखील गेले आहे.
Drishyam 2 Box Office Collection : दहाव्या दिवशीही 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा
Drishyam 2 Box Office : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn)सध्या 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशीही हा सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
Gairee : निखळ मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा 'गैरी'; 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या 'गैरी' या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला आहे. आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट असलेला 'गैरी' हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Akshaya-Hardeek Wedding : अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार
Akshaya-Hardeek Wedding : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) येत्या सहा दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. हार्दिक आणि अक्षयाने 3 मे 2022 रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर साखरपुड्याच्या सहा महिन्यानंतर ते लग्न करत आहेत. मध्यंतरी त्यांचे केळवण आणि अक्षयाची साडी विणतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
Adipurush Teaser: VFX आर्टिस्टनं 'आदिपुरुष'चा सीन केला रिक्रिएट; नेटकरी म्हणाले, 'त्यांच्यापेक्षा भारी केलंस'
Adipurush Teaser: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush)चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. काहींनी या टीझरमधील सैफ अली खानच्या लूकवर टीका केली. आता या चित्रपटातील एक अंडरवॉटर सीन एका युट्यूबर आणि VFX आर्टिस्टनं रिक्रिएट केला आहे.
View this post on Instagram
Blurr Trailer Out: ब्लरचा थ्रिलर ट्रे्लर रिलीज
Blurr Trailer Out: अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) ब्लर (Blurr) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
पाहा ट्रेलर:
Ruturaj Gaikwad: "मॅच बघितली का वहिनी? काय बॅटिंग केलीये..."; ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स
Ruturaj Gaikwad: क्रिकेटर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) काल (28 नोव्हेंबर) विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर आता अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
Bhediya Box Office: 'भेडिया' चित्रपटाच्या कमाईत घसरण; जाणून घ्या कलेक्शन
Bhediya Box Office Collection Day 4: अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. हा चित्रपट शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रिलीज झाला. पण चौथ्या मात्र या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. जाणून घेऊयात भेडिया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
View this post on Instagram
The Kashmir Files: 'सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट'; इफ्फी ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे पहिले ट्वीट
The Kashmir Files: 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. इफ्फीमध्ये 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट दाखवण्यात त्यानंतर नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपटाबाबत एक वक्तव्य केलं. सध्या नदाव यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नदाव यांच्या या वक्तव्यानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
GM.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 29, 2022
Truth is the most dangerous thing. It can make people lie. #CreativeConsciousness