Entertainment News Live Updates 29 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jun 2022 04:14 PM
Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'च्या निर्मात्यांना बसला आर्थिक फटका

Jug Jugg Jeeyo Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात रिलीज झाला आहे. विकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळे निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

Sukh Mhanje Nakki Kay Asta : जयदीप शिर्के-पाटलांचा मुलगा नाही! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार मोठं वादळ!

Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता मोठं वादळ येणार आहे. या वादळामुळे शिर्के-पाटलांच्या घरात मोठी उलथापालथ होणार आहे. नुकतेच जयदीप आणि गौरीच्या आयुष्यातील सगळी संकटं विसावली होती. दोघेही आपल्या नात्याची सुरुवात नव्याने करतच होते की, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नव्या वादळाची एन्ट्री झाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यावर संकट कोसळणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

रणवीरनं फोटोला दिलं हटके कॅप्शन

 'माझ्या बायकोच्या कमेंटची वाट बघत आहे', असं कॅप्शन देऊन रणवीरनं एक फोटो शेअर केला. पाहा रणवीरचा फोटो:





Swayamvar Mika Di Vohti: मिकाला जोडीदार शोधण्यात मदत करणार रवीना टंडन, ‘स्वयंवर’ शोमध्ये होणार अभिनेत्रीची ग्रँड एन्ट्री!

Swayamvar Mika Di Vohti: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंहचा (Mika Singh) ‘स्वयंवर: मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो टीव्हीवर प्रसारित झाला, तेव्हापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मिका सिंहसोबतच आता त्याच्या चाहत्यांनाही गायकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. बॉलिवूड गायक मिका सिंह ‘स्वयंवर’ या टीव्ही शोच्या माध्यमातून स्वत:साठी जीवनसाथी शोधत आहे. या टीव्ही शोमध्ये अनेक सुंदर मुली सहभागी झाल्या आहेत, ज्या मिका सिंहला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत मिका सिंहला त्याची परफेक्ट जोडीदार शोधणे कठीण झाले आहे.


पण, आता मिका सिंहचे काम खूप सोपे होणार आहे. कारण, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन या टीव्ही शोमध्ये एन्ट्री करणार आहे. ‘मिका दी वोटी’ या शोमध्ये रवीना टंडन सेलिब्रिटी गेस्ट म्हणून येणार असल्याचे बोलले जात आहे. एक चांगली जीवनसाथी शोधण्यात ती तिचा मित्र मिका सिंहला मदत करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शो सुरू होण्यापूर्वी मिका सिंहने प्रोडक्शन हाऊसला सांगितले होते की, त्याला रवीना टंडनसारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे. या शोमधील तिच्या एन्ट्रीबाबत रवीना टंडन म्हणाली, ‘मिकाला या ठिकाणी पाहून मी खूप आनंदी झाले आहे आणि मी मिकाला अशी मुलगी शोधण्यात मदत करेन, जी त्याच्यासोबत आयुष्य घालवेल.’


वाचा संपूर्ण बातमी

शमशेरा चित्रपटामधील 'जी हुजूर' गाणं रिलीज

Pushpa The Rule : अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा: द रूल' मध्ये होणार 'या' साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका

Pushpa The Rule :  डिसोंबर 2021 रोजी रिलीज झालेल्या  ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise)चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना तसेच डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदनानं (Rashmika Mandana) प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव  ‘पुष्पा: द रूल’(Pushpa: The Rule) असं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) हे चित्रपटाच्या कथानकाला फायनल टच देत आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

Meena, Vidyasagar : फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज अयशस्वी, साऊथ अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन

Meena Husband Vidyasagar : साऊथ अभिनेत्री मीनाचे (Meena) पती विद्यासागर (Vidyasagar) यांचे सोमवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. विद्यासागर यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मागील काही वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. यावर्षी जानेवारी महिन्यात संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला होता. मात्र, कुटुंबासोबत विद्यासागर यांनीही कोरोनावर मात केली होती. परंतु, त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडली होती.


मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी काही आठवड्यांपूर्वी विद्यासागर यांच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ब्रेन डेड रुग्णांकडूनच हे शक्य असल्याने डोनर मिळण्यात अडचणी येत होत्या. तोपर्यंत डॉक्टरांनी औषधोपचार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आहे. अभिनेता सरथकुमारने ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आणि मीना आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.


वाचा संपूर्ण बातमी

Assam Floods: आसामवासीयांच्या मदतीला धावून आलं बॉलिवूड, आमिर खान-अर्जुन कपूरसह अनेक कलाकारांनी दिली आर्थिक मदत!

Assam Floods : ईशान्य भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण पूराशी सध्या आसामवासीय संघर्ष करत आहेत. या भीषण पुरामुळे आसाम गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही आसाममधील या भीषण परिस्थीतीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या पुरामुळे तब्बल 21 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर, मृतांची संख्या 134च्या वर गेली आहे आणि लाखो लोक अजूनही संकटात आहेत. आसामला मदतीची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येकजण आसाममधील मदतकार्यासाठी आणि तेथील लोकांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढे येत आहे. यात आता बॉलिवूडनेही हातभार लावला आहे. आमिर खान (Aamir Khan) , अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अनेक कलाकारांनीही यासाठी देणगी दिली आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आसाममधील पूरपरिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सीएम रिलीफ फंडात बॉलिवूडच्या विविध व्यक्तींनी देणगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आमिर खानचे आभार मानताना लिहिले की, ‘प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी सीएम रिलीफ फंडात 25 लाखांचे योगदान देऊन आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या या काळजीबद्दल आणि मदतीबद्दल मनापासून आभार.’


वाचा संपूर्ण बातमी

'एक काळ असा होता जेव्हा चित्रपट मिळत नव्हते...'; पूजा हेगडेनं व्यक्त केल्या भावना

Pooja Hegde : अभिनेत्री पूजा हेगडेनं (Pooja Hegde) बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. पूजा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. पूजानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. या मुलाखतीमध्ये पूजानं काही काळ तिला काम मिळत नसल्याचं सांगितलं. 


 वाचा सविस्तर बातमी 

आलियाच्या प्रेग्नेंसीवर राखी सावंतची भन्नाट रिअॅक्शन

पाहा व्हिडीओ:



Happy Birthday Upasana Singh : डॉक्टर बनण्याचं स्वप्न बाळगलं अन् अभिनय विश्व गाजवलं! वाचा ‘पिंकी बुवा’ फेम अभिनेत्री उपासना सिंहबद्दल...

Upasana Singh Birthday : अभिनेत्री उपासना सिंह (Upasana Singh) हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘बिट्टू शर्मा’च्या आत्याची भूमिका साकारून प्रेक्षकांना गुदगुल्या करणाऱ्या उपासना सिंहने घरोघरी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान बनवले आहे. जवळपास तीस वर्षांपासून ती इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या भूमिका करून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टींबद्दल....


अभिनेत्री उपासना सिंहचा जन्म पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. उपासना सिंहने आपल्या करिअरची सुरुवात मुख्य अभिनेत्री म्हणून केली होती. टीव्हीच्या दुनियेसोबतच उपासना पंजाबी चित्रपटविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 1986 मध्ये उपासना सिंहने 'बाबुल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. उपासनाने आतापर्यंत 75 चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Alia Bhatt Pregnancy: ‘मी काही पार्सल नाही!’, माध्यमांतील चर्चांवर आलिया भट्टने व्यक्त केला संताप!

Alia Bhatt Pregnancy: बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने नुकतीच आपण ‘आई’ होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही गुड न्यूज शेअर केली. सोशल मीडियावर पोस्ट करताच ही बातमी व्हायरल झाली आहे. या बातमीनंतर आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ट्विटरवर ट्रेंड करू लागले होते. सगळे त्यांचे अभिनंदन करू लागले. दरम्यान, एका मीडिया रिपोर्टवर आलियाने संताप व्यक्त केला आहे.


लंडनचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रणबीर कपूर तिला घेण्यासाठी जाणार असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये लिहिलेले पाहून आलिया संतापली. आलियाला तिच्या या आनंदाच्या बातमीचा कामाच्या कमिटमेंटवर परिणाम होऊ द्यायचा नाही, असे या अहवालात सांगण्यात आले. तसेच, जुलैपूर्वी ती तिच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार आहे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. यावरच आलिया संतापली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shabaash Mithu Song Fateh : ‘शाबास मिथू’मधील 'Fateh' गाणं रिलीज; तापसी पन्नूचा खिलाडी अंदाज


बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘शाबास मिथू’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या सिनेमातील 'फतेह' हे गाणं रिलीज झालं आहे.


Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; सुमीत राघवन मुख्य भूमिकेत


‘एकदा काय झालं’ हे वाक्य सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून कोणानाकोणाकडून ऐकतो. अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला ‘एकदा काय झालं’ (Ekda Kay Zala) हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.


Dharmaveer : आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली; संजय सावंत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल


शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते पदाधिकारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली, असे म्हणत जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) निशाणा साधला आहे.


Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा; 99 व्या जयंतीला होणार रिलीज


देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव 'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' (Main Rahoon Ya Na Rahoon Yeh Desh Rehna Chahiye - Atal) असे आहे. मंगळवारी निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा करत मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


कतरिना, ईशान अन् सिद्धांत यांच्या 'फोन भूत' ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज


रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा आगामी अॅडवेंचर कॉमेडी फोन भूत एका ट्विस्टसह सादर केला जाणार आहे. या चित्रपटात 'फोन भूत' (Phone Bhoot) या सिनेमात कतरिना कैफ (Katrina Kaif),  सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टरदेखील (Ishaan Khatter) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाचे एक हटके पोस्टर शेअर करून, निर्मात्यांनी या तारखेची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये मुख्य कलाकार दिसत असून हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.