Entertainment News Live Updates 28 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
वरुणच्या 'भेडिया' नं बॉक्स ऑफिसवर केला कल्ला; जाणून घ्या कलेक्शन
दिग्दर्शक अमर कौशिक यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) , अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) यांच्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन... भेडियानं ओपनिंग डेला 7.48 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (26 नोव्हेंबर) या चित्रपटानं 9.57 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 17.05 कोटींची कमाई केली आहे. 60 ते 70 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत
मालिकाविश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत उद्यापासून 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' (Ashirwad Tuza Ekveera Aai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत एकवीरा आईच्या भूमिकेत मयूरी वाघ दिसणार आहे. तर अमृता पवारदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मयूरीने अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. मात्र या मालिकेत ती आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
'महाभारत' फेम अभिनेता फसवणुकीचा बळी; नेमकं प्रकरण काय?
'महाभारत' (Mahabharat) फेम अभिनेते पुनीत इस्सार (Puneet Issar) सध्या चर्चेत आहे. पुनीत यांचं खातं हॅक करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने पुनीत इस्सार यांचे 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. पुनीत इस्सार यांच्या दक्षिण मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आरोपीने सर्वात आधी अभिनेत्याचा ईमेल हॅक केला. त्यांनंतर 13.76 लाख रुपये चोरण्याचा प्रयत्न केला. काही कारणाने पुनीत यांनी ईमेल पाहिला तेव्हा ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली.
Iffi Goa 2022 : 'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाचा फेस्टीव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब : स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लपिड
Iffi Goa 2022 : इफ्फी सोहळ्याचा सांगता समारंभ गोव्यात पार पडतो आहे. यावेळी स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लपिड यांनी 'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाचा फेस्टीव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं आहे. द काश्मीर फाईल्स ही propaganda फिल्म आहे. अशा सिनेमाची इतक्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमध्ये केली गेलेली निवड आम्हा सर्वांसाठीच खटकणारी होती असंही ते म्हणाले.
Gairee : निखळ मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा 'गैरी'
Gairee : हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतही वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच 'गैरी' (Gairee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या 'गैरी' या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला आहे.
View this post on Instagram
Drishyam 2 Box Office Collection : 'दृश्यम 2'ची दहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट
Drishyam 2 Box Office : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशीही हा सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
'दृश्यम 2'ची कमाई :
पहिला दिवस - 15.38 कोटी
दुसरा दिवस - 21.59 कोटी
तिसरा दिवस - 27.17 कोटी
चौथा दिवस - 11.87 कोटी
पाचवा दिवस - 11 कोटी
सहावा दिवस - 9.55 कोटी
सातवा दिवस - 9 कोटी
आठवा दिवस - 7.87 कोटी
नऊवा दिवस - 14.05 कोटी
दहावा दिवस - 17-18 कोटी
एकूण कमाई - 140 कोटींपेक्षा अधिक
Akshaya-Hardeek Wedding : अखेर मुहूर्त ठरला; येत्या सहा दिवसात राणा अन् पाठकबाई अडकणार लग्नबंधनात
Akshaya-Hardeek Wedding : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) येत्या सहा दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.
View this post on Instagram
Rasika Dugal : बॉलिवूडमध्ये 13 वर्षांत न मिळालेली प्रसिद्धी ओटीटीनं दिली; रसिका दुग्गलकडून खंत व्यक्त
Rasika Dugal : गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ओटीटीमुळे लोकप्रियता मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. गेली 13 वर्ष बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी, प्रसिद्धीसाठी झगडणारी अभिनेत्री रसिका दुगलला ओटीटीने चांगलीच प्रसिद्धी दिली.
View this post on Instagram