Entertainment News Live Updates 26 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Jun 2022 11:24 PM
11 लाखांच्या पैठणीचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणेंना

दार उघड वहिनी...दार उघड...असं म्हणत आदेश बांदेकरांनी 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सुरू केला. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाने म्हणजेच 'महामिनिस्टर'ने (Mahaminister) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. नुकताच 'महामिनिस्टर'चा महाअंतिम सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या महापैठणीच्या मानकरी लक्ष्मी ढेकणे ठरल्या आहेत. 

आयुष्मान खुरानाचा 'अनेक' नेटफ्लिक्सवर रिलीज

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'अनेक' (Anek) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमागृहात फारशी जादू दाखवू न शकलेला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 'अनेक' हा सिनेमा प्रेक्षक आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'पावनखिंड', 'झिम्मा' नंतर आता एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी' (Karkhanisanchi Waari) या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 3 जुलैला दुपारी एक वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. 

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे 'SYL' गाणं यूट्यूबने हटवलं; दोन दिवसांत मिळाले होते 27 मिलियन व्ह्यूज

दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या निधनानंतर त्यांचे 'SYL' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अल्पावधितच हे गाणं सिद्धूच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. पण आता सिद्धूचे हे गाणं यूट्यूबने हटवलं आहे. 

Tejaswini Pandit : आईला मिळाला ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार'; तेजस्विनी पंडितने भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

अमोल कोल्हेंनी केली 'शिवप्रताप-गरुडझेप' सिनेमाची घोषणा

 अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप-गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 





कालीन भैया ते गुड्डू... सिनेमांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे स्टार झाले कलाकार

OTT Stars : मनोरंजन क्षेत्रात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना काळात ओटीटी माध्यमामने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांची आणि वेबसीरिजची प्रेक्षक प्रतीक्षा करत असतात. ओटीटीमुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली आहे. तसेच हे कलाकार लोकप्रिय झाले आहेत. या कलाकारांच्या यादीत बॉबी देओल, पंकज त्रिपाठीसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

आज रंगणार 'महामिनिस्टरचा' महाअंतिम सोहळा

दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली 18 वर्ष सन्मान करत आला आहे. होम मिनिस्टरचं नवं पर्व 'महामिनिस्टर'देखील (Mahaminister) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आज 'महामिनिस्टरचा' महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 





रत्नागिरीच्या वाहिनींनी जिंकली 11 लाखाची पैठणी

रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे ठरल्या महामिनिस्टरच्या 'महाविजेत्या'! जिंकली 11 लाखांची पैठणी


 





Pushpa The Rule : ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं वजन? अभिनेत्याचे नवे फोटो पाहून चाहते झाले अवाक्!

Pushpa The Rule : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा : द राईज' (Pushpa The Rise) हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाल्यानंतर आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची अर्थात ‘पुष्पा : द रुल’ची (Pushpa The Rule) आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. नुकताच अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाला. यावेळी अभिनेता वाढलेले केस आणि दाढीसह ‘पुष्पा’ लूकमध्ये दिसला. मात्र, यावेळी त्याने वजन प्रचंड वाढलेले दिसले.


अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी (Pushpa 2) वजन वाढवले आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल’  या चित्रपटातील लूकचे हे फोटो पाहून चाहते खूपच उत्साहित झाले आहे. तर, सोशल मीडियावर या चित्रपटाच्या कथेला नेमकं काय वळण मिळेल, याचा अंदाज लावताना दिसत आहेत. मात्र, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने आपले वजन खूप वाढवले ​​आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी हा फोटो शेअर केला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Jugjugg Jeeyo BO Collection : ‘जुग जुग जियो’ला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद! दोन दिवसांत जमवले ‘इतके’ कोटी!

Jugjugg Jeeyo BO Collection : बॉलिवूड स्टार्स वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'जुगजुग जियो'ला (Jugjugg Jeeyo) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या बॉलिवूड चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 9.28 कोटींची कमाई करत यशस्वी घौडदौड सुरु केली आहे. 'जुग जुग जियो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.


पहिल्या दिवसाच्या सर्वोत्तम कमाईनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ दिसून आली. शुक्रवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 27 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रविवारी देखील या चित्रपटाचे कलेक्शन चांगले असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मधून ‘अरुंधती’ने घेतला ब्रेक! मालिकेत कधी परतणार?

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या मालिकेत सध्या बरीच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कथानक आणखी उत्कंठावर्धक झालं आहे. मात्र, मालिका टर्निंग पॉईंटला असताना मालिकेत अरुंधतीची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकत होती. अरुंधती का दिसत नाहीये, तिने मालिका सोडली का? चाहत्यांकडून वारंवार असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, मालिकेत अरुंधती का दिसत नाहीये याचा खुलासा नुकताच झाला आहे.


स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ची अर्थात ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांना या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी साकारलेली चौकट मोडणारी आई सगळ्याच प्रेक्षकांना भावली आहे.


 वाचा संपूर्ण बातमी

‘सिटी ऑफ लव्ह’मध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन, मलायकासोबत खास अंदाजात दिसला अर्जुन कपूर!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची ‘लेडी लव्ह’ अर्थात अभिनेत्री मलायका अरोरासोबत 'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा करत आहे.


 





सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी मनकिरत औलखला क्लीन चिट, पुराव्यांअभावी गायकाची सुटका!

Sidhu Moose Wala Murder : पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder) पंजाब पोलिसांनी गायक मनकिरत औलखला क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांना औलख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. गायक मनकिरत औलखवर सिद्धू मुसेवाला यांची माहिती गुंडांना दिल्याचा आरोप होत होता.


सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर, गँगस्टर दविंदर बंबीहा ग्रुपच्यावतीने गायक मनकिरत औलखचा मुसेवालाच्या हत्येत हात असल्याचे सांगण्यात आले. यानंतर लॉरेन्स बिश्नोई आणि मनकिरत औलख यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते आणि दावा केला होता की, दोघे खास मित्र आहेत. अशाच एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते.


वाचा संपूर्ण बातमी

Nidhi Bhanushali Bold Look : ‘भिडे मास्तरां’च्या लेकीने सोशल मीडियावर शेअर केला बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते म्हणतायत...

Nidhi Bhanushali : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या प्रचंड चर्चेत आहे. यातील अनेक कलाकारांनी आता मालिकेला रामराम केला आहे. मात्र, या मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही कलाकार प्रचंड चर्चेत असतात. यापैकीच एक नाव म्हणजे निधी भानुशाली (Nidhi Bhanushali). निधीने या मालिकेत ‘भिडे मास्तरां’ची लेक ‘सोनू’ची भूमिका केली होती. अर्थात काही कारणास्तव तिने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली आहे. मात्र, तरीही चाहते तिला ‘सोनू’ म्हणूनच ओळखतात.


‘सोनू’ साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने शो सोडल्याला आता 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण असे असूनही निधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. निधी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांच्या हृदयाचा ठोका वाढवत असते. निधी भानुशाली आता पुन्हा एकदा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेजवर असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांचे मन घायाळ झाले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे अर्जुन कपूरच्या आरोग्यावरही झालेला परिणाम, वैयक्तिक आयुष्यामुळे वादात राहिला अभिनेता!

Arjun Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल कमी, पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत असतो. बॉलिवूडचा हँडसम आणि फिटनेसफ्रीक अभिनेता एकेकाळी प्रचंड लठ्ठ होता. एक काळ असा होता, जेव्हा अर्जुनचे वजन 150 किलोच्या पुढे गेले होते. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी अर्जुन कपूरला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते.


अर्जुन कपूरच्या आयुष्यातील हा सर्वात वाईट टप्पा होता. याचा काळात त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाने तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. अर्जुन त्या दिवसांमध्ये अनेक समस्यांमध्ये अडकला होता आणि त्याने जास्त खाणे सुरू केले. याचा परिणाम असा झाला की, वयाच्या 16व्या वर्षी त्याचे वजन 150 किलोच्या पुढे गेले होते. त्यामुळे त्याला दमा देखील झाला होता आणि तो जास्त काळ धावू शकत नव्हता.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘पठाण’च्या रिलीज डेटसह शाहरुख खानचा नवा लूक प्रदर्शित!


बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान याने आज मनोरंजन विश्वात आपल्या कारकिर्दीची 30 वर्ष पूर्ण केली आहेत. याच खास निमित्ताने आज त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळाले आहे. शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देत, त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.


Boyz 3 : 'बॉईज' परत येतायत... सोशल मीडियावर झळकतोय 'बॉईज 3'चा ट्रेलर


Boyz 3 : काही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'ने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा 'बॉईज 2' मधून ते डबल धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला हे तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.


अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे बहुप्रतीक्षित गाणे अखेर आज (25 जून) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे. नुकताच अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर-खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे, तिने म्हटले आहे.


Shahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती'... राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट


गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द, बुलढाण्यातील प्रेक्षकांची चित्रपटगृह चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार!


अभिनेते प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी मुख्य भूमिका साकारली असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होताना दिसत आहे. याच विरोधात आवाज उठवत बुलढाण्यातील प्रेक्षकांनी चित्रपटगृह मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.