Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मधून ‘अरुंधती’ने घेतला ब्रेक! मालिकेत कधी परतणार?
Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ची अर्थात ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांना या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या मालिकेत सध्या बरीच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कथानक आणखी उत्कंठावर्धक झालं आहे. मात्र, मालिका टर्निंग पॉईंटला असताना मालिकेत अरुंधतीची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकत होती. अरुंधती का दिसत नाहीये, तिने मालिका सोडली का? चाहत्यांकडून वारंवार असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, मालिकेत अरुंधती का दिसत नाहीये याचा खुलासा नुकताच झाला आहे.
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ची अर्थात ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांना या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी साकारलेली चौकट मोडणारी आई सगळ्याच प्रेक्षकांना भावली आहे.
कुठे गेली ‘अरुंधती?
मीडिया रिपोर्टनुसार ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांनी मालिका सोडली नसून, त्या सध्या ब्रेकवर आहेत. काही वैयक्तिक कारणामुळे मधुराणी यांनी सध्या सुट्टी घेतली आहे. मात्र, त्या लवकरच मालिकेत परतणार आहेत. त्या सुट्टीवर असल्याने सध्या मालिकेचा संपूर्ण ट्रॅक अनिरुद्ध आणि संजनावर वळवण्यात आला आहे. मात्र, आता लवकरच अरुंधती आपलं खाजगी काम उरकून, मालिकेत पुन्हा एकदा झळकणार आहे. येत्या काही भागांत अरुंधतीची एन्ट्री होणार आहे.
अनघाचा अपघात होणार!
मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि संजना यांच्यातील वाद दाखवले जात आहेत. याच वादात आता पुन्हा एकदा संजनावर मोठा आरोप लागणार आहे. संजना आणि अनघा घरातील वरच्या माळ्यावर जात असताना गर्भवती असणारी अनघा पाय घसरून जिन्यावरून खाली पडते आणि तिला मार लागतो. तर, अनिरुद्ध मात्र अनघाला जिन्यावरून तूच ढकलंलस, असं म्हणत संजनाला बोल लगावतो. जर, अनघाला काही गंभीर दुखपत झाली तर, संजनाला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तो देतो.
यामुळे आता मालिका एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत पुढे नेमकं काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
संबंधित बातम्या