Happy Birthday Arjun Kapoor : आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे अर्जुन कपूरच्या आरोग्यावरही झालेला परिणाम, वैयक्तिक आयुष्यामुळे वादात राहिला अभिनेता!
Arjun Kapoor Birthday : अर्जुन कपूरच्या आयुष्यातील हा सर्वात वाईट टप्पा होता. याचा काळात त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला.
Arjun Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल कमी, पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत असतो. बॉलिवूडचा हँडसम आणि फिटनेसफ्रीक अभिनेता एकेकाळी प्रचंड लठ्ठ होता. एक काळ असा होता, जेव्हा अर्जुनचे वजन 150 किलोच्या पुढे गेले होते. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी अर्जुन कपूरला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते.
अर्जुन कपूरच्या आयुष्यातील हा सर्वात वाईट टप्पा होता. याचा काळात त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाने तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. अर्जुन त्या दिवसांमध्ये अनेक समस्यांमध्ये अडकला होता आणि त्याने जास्त खाणे सुरू केले. याचा परिणाम असा झाला की, वयाच्या 16व्या वर्षी त्याचे वजन 150 किलोच्या पुढे गेले होते. त्यामुळे त्याला दमा देखील झाला होता आणि तो जास्त काळ धावू शकत नव्हता.
मलायकासोबतच्या नात्यामुळे चर्चेत
मात्र, बदलत्या वेळेनुसार अर्जुनने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वातही बदल केला. अर्जुन कपूर अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत असतो. अर्जुन कपूर सध्या ‘दबंग’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान याची पूर्वपत्नी मलायका अरोरा हिला डेट करत आहे. या दोघांच्या नात्याच्या सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चा सुरु असतात.
अर्पिताशी ब्रेकअपनंतर सलमानने दिली साथ!
2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पितासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यावेळी अभिनेता फक्त 18 वर्षांचा आणि तब्बल 150 किलो वजनाचा होता. एका मुलाखतीदरम्यान, या नात्याबद्दल बोलताना अर्जुन म्हणाला की, ‘माझे पहिले सिरिअस नाते अर्पितासोबत होते. मैने प्यार क्यूं किया या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमच्या नात्याची सुरुवात झाली. डेटिंगच्या काळात मला अर्पिताचा भाऊ सलमान खानची भीती वाटत होती, पण मी त्याच्याकडे जाऊन सर्व काही सांगितले. मी स्वतः अर्पिताच्या कुटुंबीयांना आमच्या नात्याबद्दल सांगितले आणि त्यांनी आमचे नाते मान्यही केले.’
अर्जुन कपूरचा अर्पिताशी ब्रेकअप झाला त्यावेळी तो ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होत. सर्व काही सुरळीत सुरु होते. पण, त्याच दरम्यान अर्पिताने अचानक अर्जुनसोबत ब्रेकअप केले. त्यांच्या ब्रेकअपनंतर सलमान खानने त्याला खूप साथ दिली. अर्जुन म्हणतो, अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्याची प्रेरणा सलमान खान होता आणि त्याच्या मदतीनेच अर्जुनने 50 किलो वजन कमी केले होते.
हेही वाचा :
Arjun Kapoor: 'मी काय टायगर श्रॉफ नाहीये'; फिटनेस जर्नीबाबत अर्जुन कपूरनं सोडलं मौन
Malika and Arjun Wedding Special Report: मलायका आणि अर्जुन लग्न करणार?
12 वर्षांनी लहान अर्जुन कपूरला डेट करणाऱ्या मलायका अरोराने सांगितली 'ही' मोठी गोष्ट!