Entertainment News Live Updates 25 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Tunisha Sharma : अभिनेत्री टुनिशा शर्माने उचललं टोकाचं पाऊल
Tunisha Sharma : अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय. नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी टुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी टुनिशाने शेअर केली होती.
'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
Maharashtra Shahir : मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील साने गुरुजींचा लूक आज आऊट झाला आहे.
Sajid Khan : साजिद खानवर पुन्हा लैंगिक छळाचा आरोप
Sajid Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शिक साजिद खान (Sajid Khan) सध्या भाईजानच्या बिग बॉसमुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. साजिद बिग बॉसममध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. गेल्या काही दिवसांत साजिदवर गंभीर आरोप केले जात आहेत. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉसमधून बाहेर काढण्याचीही मागणी केली गेली. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता साजिद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी संपप्त प्रतिक्रिया देत आहेत. मराठमोळी अभिनेत्री जयश्री गायकवाडने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली आहे,"आठ वर्षांपूर्वी एका लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शकाने मला एका पार्टीत नेले होते. त्यावेळी सादिज खानशी माझी भेट झाली. त्याला भेटून अर्थात मला आनंद झाला".
Avatar 2 Box Office Collection : 'अवतार 2'ची कमाल! रिलीजच्या आठव्या दिवशीच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील
Avatar 2 Collection : हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा (James Cameron) 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
Sheezan Khan : शिझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या शिझान मोहम्मद खानला (Sheezan Khan) 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिझानला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सीझानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
TV actor Tunisha Sharma death case: Tunisha Sharma's co-star & accused Sheezan Khan sent to 4-day police custody by Vasai court in Mumbai. pic.twitter.com/0y55NcQ2LC
— ANI (@ANI) December 25, 2022
Tunisha Sharma : तुनिषाच्या कुटुंबियांचा मोठा खुलासा
Tunisha Sharma : तुनिषा प्रेग्नंट नसल्याचा खुलासा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
Main Atal Hoon : राजकारणी, पंतप्रधान, कवी...; 'मैं अटल हूँ' सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट
Main Atal Hoon : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
View this post on Instagram
Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा; 'या' अभिनेत्रीचा दावा
Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा दास्तान ए काबुल' (Ali Baba : Dastaan-E-Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान मोहम्मद खान (Sheezan Mohammad Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत 'मॅडम सर' फेम प्रीती तनेजाने दावा केला आहे की, तुनिषा आणि शिझान रिलेशनध्ये होते. तुनिषा प्रेग्नंट असल्याने तिने शिझानकडे लग्नाची मागणी केली होती. पण शिझानने लग्नाला स्पष्ट नकार दिला. तरीदेखील तुनिषा त्याला लग्नासाठी विचारत राहिली पण शिझान मात्र लग्नाला नकार देत राहिला.
Tunisha Sharma : ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेलेली तुनिषा शर्मा
Tunisha Sharma : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा शिझानसोबत रिलेशनमध्ये होती. 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती.