Entertainment News Live Updates 24 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Raghav Chadha : आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राचे अफेअर सुरू? डिनरनंतर आज मुंबईत लंचला दोघे एकत्रित
Parineeti Chopra and Raghav Chadha Spotted: राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री यांच्या अफेअरच्या गोष्टी या काही नव्या नाहीत. अनेकदा त्यांची भेट होते आणि गाठी कायमस्वरुपी बांधल्या जातात. अशीच एक बातमी समोर आली असून आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबईत एकत्रित स्पॉट झाले आहेत. बुधवारी हे दोघं एकत्रित डिनर घेताना दिसून आले होते, तर आज त्यांनी एकत्रित लंच केल्याचं समोर आलं. या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे का अशी जोरात चर्चा रंगली आहे.
शेखर कपूर म्हणतो, पुन्हा 'मिस्टर इंडिया' बनवणार नाही; श्रीदेवी, अमरीश पुरी आणि सतीश कौशिक यांच्या आठवणीने रडू कोसळेल
Shekhar Kapur : मिस्टर इंडिया या चित्रपटाचा रिमेक येणार अथवा पुढील भाग येणार... अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती. यावर आता चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मिस्टर इंडिया हा चित्रपट पुन्हा बनवणार नसल्याचे स्पष्ट सांगितलेय. indianexpress.com ला दिलेल्या मुलाखतीवेळी मिस्टर इंडियाच्या आठवणीने शेखर कपूर भावूक आणि उदासीन झाले होते. ते म्हणाले की, मिस्टर इंडिया चित्रपट पुन्हा बनवणार नाही. कारण, चित्रपटाचे नाव निघाल्यानंतर हवा हवाईची भूमिका करणारी श्रीदेवी, मोगॅम्बोची भूमिका साकारणारे अमरीश पुरी आणि कॅलेंडरची व्यक्तीरेखा साकारने सतिश कौशिक यांच्या आठवणीत मी भावूक होतो. हा चित्रपट पुन्हा करायचे झाल्यास मला रडू कोसळेल. तसेच हा चित्रपट आता अयशस्वी होईल, असे वाटतेय. यावेळी सतिश कौशिक यांच्या निधनाबद्दल शेखर कपूर यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, "मिस्टर इंडिया'चा रिमेक करण्याची इच्छा नाही. कारण या चित्रपटातील प्रत्येक पात्राची निरागसता आणि भोळेपणा या चित्रपटात आहे. या चित्रपटाची पुन्हा निर्मिती केल्यास चुकीचे आहे.
Sarja Movie Song: आदर्श शिंदेचं 'धड धड...' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; सर्जा 'या' दिवशी होणार रिलीज
Sarja Movie Song: 'सर्जा' (Sarja) या चित्रपटातील 'जीव तुझा झाला माझा...' हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना 'सर्जा'मधील 'धड धड...' (Dhad Dhad) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल.
Aani Baani: रुपेरी पडद्यावर ‘आणीबाणी’; प्रवीण तरडे, सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत
Aani Baani: 'आणीबाणी' (Aani Baani) म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे (Pravin Tarde), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), संजय खापरे (Sanjay Khapare), वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सोडले मौन; म्हणले, 'मला...'
Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. बुधवारी (22 मार्च) हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यांच्या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे. का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता अफेरच्या चर्चेवर राघव चढ्ढा यांनी मौन सोडलं आहे.
AAP के राज्यसभा सांसद @raghav_chadha का हाल ही में परिणीति चोपड़ा संग वीडियो वायरल हुआ था. इस पर जब एबीपी न्यूज़ ने राघव से सवाल पूछा तो देखिए उन्होंने क्या जवाब दिया.... @jainendrakumar #RaghavChadha #ParineetiChopra #AamAadmiParty #Bollywood pic.twitter.com/11xIAQfZyM
— ABP News (@ABPNews) March 24, 2023
3 Idiots Sequel: 14 वर्षांनंतर 'थ्री-इडियट्स-2' येणार? करीनानं शेअर केला व्हिडीओ
3 Idiots Sequel: थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांनी थ्री इडियट्स या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. नुकताच अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) यांचा एक फोटो दिसत आहे. या फोटोवर 'इडियट्स' असं लिहिलेलं दिसत आहे
View this post on Instagram
Akshay Kumar: शूटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी; अॅक्शन सीन शूट करताना दुखापत
Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लवकरच त्याच्या 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय हा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटामधील एका अॅक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अक्षय हा स्कॉटलँड येथे गेला होता. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. अक्षयच्या गुडख्याला दुखापत झाली आहे.
Pradeep Sarkar: दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन; परिणीता, मर्दानी या चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन
Pradeep Sarkar: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप सरकार हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचे डायलिसिसही सुरू होते. प्रदीप सरकार यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे रात्री तीन वाजता त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आणि 3.30 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. आज दुपारी चार वाजता सुमारास सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Pradeep Sarkar. Dada. RIP. pic.twitter.com/htxK4PiTLN
— Hansal Mehta (@mehtahansal) March 24, 2023