Entertainment News Live Updates 23 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
पहा व्हिडीओ:
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी आहे . प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) अवंतिकाची भूमिका साकारत असून ही भूमिका साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे.
पाहा व्हिडीओ:
Shamshera : शमशेरा (Shamshera) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काल (21 जून) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे.
पाहा वाणीचा लूक
Adipurush : प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. बाहुबली या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेट आलेल्या प्रभासनं फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रभास हा आदिपुरूष (Adipurush)या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामुळे प्रभास हा सध्या चर्चेत आहे. प्रभासनं या चित्रपटात काम करण्यासाठी त्याचं मानधन वाढवलं आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
Ms. Marvel Episode 1 Review : मार्वलचे चित्रपट म्हटले की, त्यातले भन्नाट व्हीएफक्स आणि सुपर पॉवर्स या गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात. कॅप्टन अमेरिका, हल्क, ब्लॅक विडो, मून नाईट ते स्पायडर मॅन, बॅटमॅन पर्यंत सगळीच सुपरहिरोची पात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली. या पात्रांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यश मिळवलं. आतापर्यंत या मार्वल सीरिजमधील बहुतांश पात्र ही अमेरिकन पार्श्वभूमी असणारी होती. मात्र, ‘मिस मार्वल’च्या (Ms. Marvel) रूपाने पहिल्यांदाच एक नवा प्रयोग करण्यात आला आहे.
मार्वलने या आधीही ‘लेडी सुपरहिरो’ प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. पण. ‘मिस मार्वल’ मात्र त्यात वेगळी ठरली आहे. सगळ्याच बाबतीत ‘मिस मार्वल’ वेगळी ठरण्याचं कारण आहे तिची कौटुंबिक पार्श्वभूमी. मार्वलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक पाकिस्तानी मुस्लिम मुलीला सुपर हिरो म्हणून दाखवण्यात आले आहे आणि हेच या सीरिजचे वेगळेपण आहे. अनेकांना ही संकल्पना रुचलीये. तर, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. या बेव सीरिजचे तीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज आपण पहिल्या एपिसोडमध्ये नेमकं काय आहे? तो कसा वाटला?, ते जाणून घेणार आहोत.
Kitchen Kallakar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील काही नेते मंडळीदेखील हजेरी लवतात. नुकतीच या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हजेरी लावली. किचन कल्लाकार हा एपिसोड आज (23 जून) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या एपिसोडचे काही प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रामदास आठवले त्यांच्या विनोदीशैलीनं कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांना खळखळून हसवताना दिसत आहेत.
पाहा लूक
Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा ड्रग्जच्या अँगलने तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक (Showik) आणि आणखी काही लोकांना मुख्य आरोपी बनवले आहे. आता या प्रकरणात एनसीबीने रिया, शौविक आणि इतर आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यावेळी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील न्यायालयीन कामासाठी तिथे उपस्थित होते. NCB ने रिया, शौविकसह आणखी काही लोकांवर सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे.
विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले की, आरोपपत्रात सर्व आरोपींचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोपपत्राचा मसुदा दाखल करताना त्यांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्जचा वापर केला होता आणि त्यांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले होते.
पुढील सुनावणी 12 जुलैला होणार!
विशेष सरकारी वकील म्हणाले की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार आहे. सुनावणीदरम्यान रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती कोर्टात हजर होते. ते म्हणाले की, दोषमुक्तीच्या याचिकांवर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चित केले जातील, असे न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारी रिया आणि शौविकसह अन्य आरोपी न्यायालयात हजर झाले होते. विशेष न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे.
Swayamvar Mika Di Vohti : प्रसिद्ध पंजाबी गायक मिका सिंहचं (Mika Singh) स्वयंवर 'मिका दी वोटी’ला (Swayamvar : Mika Di Vohti ) धमाकेदार सुरुवात झाली आहे. या शोमध्ये मिकाची जोडीदार बनण्याचे स्वप्न घेऊन 12 तरुणी सहभागी झाल्या आहेत. सध्या छोट्या पडद्यावर या शोची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या शोचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘मिका दी वोटी’चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओत पहिल्याच दिवशी मिका एका तरुणीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.
स्टार भारत वाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 'मिका दी वोटी'चा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मिका सिंह कोलकत्त्याची स्पर्धक तरुणी प्रणितिका दाससोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. रोमँटिक गाण्यावर डान्स करताना मिकाने या तरुणीचे चुंबनही घेतले. शेजारी बसलेल्या इतर स्पर्धक तरुणी हे सर्व पाहून कमेंट करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Koffee With Karan 7 : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा 7वा सीझन (Koffee With Karan 7) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींच्या त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेल्या अनेक गोष्टींवर चर्चा करतात. या सीझनमध्ये करणच्या शोमध्ये बहुचर्चित अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हजेरी लावणार आहे. या दरम्यान अभिनेत्री तिच्या आयुष्यातील अनेक रहस्यांचा उलगडा करणार आहे. यावेळी ती आपल्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाविषयीही सांगणार आहे.
समंथा चित्रपटांच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु, तिचे आयुष्य अनेक विवादांनी वेढलेले आहे. सध्या अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले आहे. आता समंथा लवकरच करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावणार आहे.
Dr. Jabbar Patel Birthday : डॉक्टरकीसाठी स्टेथेस्कोप हाती धरलेल्या डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांना कॅमेरा अधिक खुणावत होता. अखेर स्टेथेस्कोप खाली ठेवून कॅमेरा हाती घेत एक प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, चित्रपट प्रेमाने ते या क्षेत्राकडे वळले. या क्षेत्रात पदार्पण करत, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.
जब्बार रझाक पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी महाराष्ट्राची पवित्र संतभूमी, अर्थात पंढरपूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांना शालेय नाटकांत काम करण्याची आणि सोबतच ते नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. हे नाटकं त्यांच्या या क्षेत्रात येण्याची पहिली पायरी ठरलं. सोलापुराचे श्रीराम पुजारी हे त्या काळचं नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठं नाव होतं. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. या वास्तव्यात सगळ्या मातब्बर व्यक्तिमत्वांना जवळून जाणून घेता यावे, म्हणून पडेल ते काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.
Raj Babbar Birthday : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) आज 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर राजकारणातही आपला ठसा उमटवला आहे. राज बब्बर यांचा जन्म 23 जून 1952 रोजी आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांनी आग्रा येथील मुफिद-ए-आम इंटर कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज बाबर यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
राज बब्बर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री केली. या अभिनेत्याने केवळ हिंदीच नाही, तर पंजाबी चित्रपटांमध्येही भरपूर काम केले आहे. 1977पासून ते पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. ‘मुकद्दर का फैसला’, ‘पूनम’ आणि ‘जिद्दी’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. चाल जाणून घेऊया त्यांच्या अशाच काही चर्चित आणि गाजलेल्या चित्रपटांबद्दल...
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे.
मराठी सिनेसृष्टीचे महानायक अशोक सराफ येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ (Ashok Saraf) ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती; वरुण सुखराज करणार दिग्दर्शन
अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव आहे... 'शाहू छत्रपती'.
'भूल भुलैया 2' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे.
ज्यांचा कडक असेल डान्स त्यांना मिळेल चान्स; चिंचि चेटकीन शोधणार लिटिल मास्टर्स
‘डान्स महाराष्ट्र डान्स’हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी लवकरच 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कथाबाह्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -