Adipurush : आदिपुरुषच्या निर्मात्यांना झटका; आता प्रभास घेणार 120 कोटी मानधन?
प्रभास हा आदिपुरूष (Adipurush)या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Adipurush : प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. बाहुबली या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेट आलेल्या प्रभासनं फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रभास हा आदिपुरूष (Adipurush)या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामुळे प्रभास हा सध्या चर्चेत आहे. प्रभासनं या चित्रपटात काम करण्यासाठी त्याचं मानधन वाढवलं आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
आदिपुरुष या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी प्रभासनं चित्रपट निर्मात्यांकडे 120 कोटींची मागणी केली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. तो आधी या चित्रपटासाठी 90 ते 100 कोटी मानधन घेणार होता. पण आता तो 120 कोटी रुपयांची मागणी करत आहे, असं म्हटलं जात आहे. प्रभासच्या या निर्णयामुळे निर्मात्यांना मोठा झटका बसला असल्याचंही म्हटलं जात आहे. कारण चित्रपटाचे अजून बरेच शूट बाकी आहे आणि अशा परिस्थितीत प्रभासच्या या निर्णयामुळे चित्रपटाचे बजेट 25 टक्क्यांनी वाढणार आहे. आजून प्रभासनं याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
प्रभासच्या या चित्रपटाच्या मेकिंगसाठी 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. इतकंच नाही, तर हे केवळ चित्रपट निर्मितीचे बजेट असल्याचे सांगितले जाते. यामध्ये प्रमोशन बजेटचा समावेश करण्यात आलेला नाही. या मोठ्या बजेटनंतर ‘आदिपुरुष’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या बजेटने एसएस राजामौलीच्या ‘बाहुबली 2’ला देखील मागे टाकले आहे. बाहुबली सीरीजच्या दोन्ही चित्रपटांचे बजेट जवळपास 450 कोटी होते. ‘आदिपुरुष’ चित्रपटात त्या काळातील जग निर्माण करण्यासाठी VFX चा वापर केला जात आहे.
प्रभासने बॅक टू बॅक दोन चित्रपट फ्लॉप झाले
प्रेक्षक प्रभासच्या आदिपुरुषा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभासचे बॅक टू बॅक दोन चित्रपट हे फ्लॉप ठरले आहेत. 2019 मधील 'साहो' आणि दुसरा 'राधे श्याम' हे चित्रपट प्रभासचे फ्लॉप ठरलेले चित्रफट आहेत.
हेही वाचा:
- Adipurush : अबब! प्रभासच्या ‘आदिपुरुष’वर खर्च झाले ‘इतके’ कोटी, मेकिंग बजेटच्याबाबतीत ‘बाहुबली’लाही टाकले मागे!
- Adipurush : ‘रामनवमी’च्या निमित्ताने दिसला प्रभासचा ‘राम’ अवतार, ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने शेअर केला खास व्हिडीओ!