एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 21 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 21 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Roadies 19 : 'रोडीज 19' लवकरच होणार सुरू

Roadies 19 : 'रोडीज'च्या (Rodies) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या बहुचर्चित कार्यक्रमाचं पुढचं पर्व अर्थात 'रोडीज 19' (Rodies 19) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  थरार आणि साहसी कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या रिअॅलिटी शोचा टीझर आऊट झाला असून प्रेक्षक कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहे. 'रोडीज 19'च्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा कार्यक्रम तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. 'रोडीज 18' संपल्यापासून चाहते पुढच्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. आता टीझर रिलीज करत निर्मात्यांनी जाहीर केलं आहे की, लवकरच 'रोडीज 19'च्या ऑडिशनला सुरुवात होईल. 

दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या मुंबईकर होण्यासाठी सज्ज

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सूर्याची (Suriya) गणना होते. सूर्याचा 2021 साली आलेला 'जय भीम' (Jai Bhim) हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील सूर्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. 

Rohit Shetty : 'स्कूल कॉलेज आणि लाइफ'चा ट्रेलर आऊट

Rohit Shetty School College Ani Life Trailer Out : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मराठी सिनेसृष्टीत झळकण्यासाठी सज्ज आहे. 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' (School College Ani Life) या सिनेमाच्या माध्यमातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. स्कूल कॉलेज आणि लाइफ' या सिनेमात तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण परब (Karan Parab) मुख्य भूमिकेत आहे. हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि महाविद्यालयीन आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला असून तो खूपच मनोरंजक आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतील, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. शाळकरी मुलांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. 

17:51 PM (IST)  •  21 Mar 2023

Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन?

Ajay Devgn : 'भोला' या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या अजय या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत असून या सिनेमासाठी त्याने 30 कोटी मानधन घेतलं आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून या सिनेमासाठी तिने चार कोटी मानधन घेतलं आहे. तसेच संजय मिश्राने या सिनेमसाठी 85 लाख आकारले आहेत. अभिषेक बच्चनची झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्याने एक कोटी मानधन घेतलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

16:41 PM (IST)  •  21 Mar 2023

Chetan Kumar Arrested : कन्नड अभिनेता चेतन कुमार पोलिसांच्या ताब्यात

Chetan Kumar Arrested : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) अडचणीत वाढ झाली आहे. हिंदू धर्माबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचं ट्वीट चेतन कुमारने केलं होतं. 

15:04 PM (IST)  •  21 Mar 2023

KKBKKJ Song Out : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधील 'Jee Rahe The Hum' गाणं आऊट

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Jee Rahe The Hum Song Out : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'जी रहे थे हम' (Jee Rahe The Hum) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं भाईजानने स्वत: गायलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

14:05 PM (IST)  •  21 Mar 2023

Dharmendra : वयाच्या 87 व्या वर्षी धमेंद्र रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज

Dharmendra Comeback : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक केलं आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमात धर्मेंद्र महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

13:17 PM (IST)  •  21 Mar 2023

Salman Khan : धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया समोर

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याने तो चर्चेत आला आहे. सलमानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक मेल पाठवत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सलमान म्हणाला,"जेव्हा जे व्हायचं असेल तेव्हा ते होईल". 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget