एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 20 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 20 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतळी चितळेला अटक करण्यात आली. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) लावल्यावरुन आता पोलीस अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात कळवा पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) का लावलं याचं उत्तर आणि अहवाल मागितला आहे.

सिद्धू मूसेवालाच्या गाण्याचा नवा विक्रम, ‘बिलबोर्ड 200’च्या यादीत ‘295’ला मिळाले मानाचे स्थान!

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग देशातच नाही, तर परदेशातही आहे. आता सिद्धू मूसेवालांच्या '295' या गाण्‍याने जागतिक ‘बिलबोर्ड 200’च्‍या यादीमध्‍ये स्‍थान निर्माण केले आहे. मात्र, हे यश पाहायला सिद्धू आज आपल्यात नाहीत.  या विक्रमानंतर चाहते त्‍यांची आठवण करून भावूक होत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्‍या प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात सिद्धू मूसेवाला यांचे ‘295’ हे गाणे जागतिक बिलबोर्ड यादीत 154व्या क्रमांकावर आहे.

कधी काळी बॅकग्राउंड डान्सर म्हणून केलं काम, आता साऊथसह बॉलिवूड गाजवतेय काजल अग्रवाल!

Kajal Aggarwal Birthday : साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आज (19 जून) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली. साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर  अभिनेत्री काजळ अग्रवालने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि बॉलिवूडविश्वही गाजवले.

काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.

22:01 PM (IST)  •  20 Jun 2022

कंगनाचा 'धाकड' आता ओटीटीवर येणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा धाकड सिनेमा आता झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

18:19 PM (IST)  •  20 Jun 2022

'स्ट्रेंजर थिंग्स'च्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांची पसंती; 781.04 मिलियनहून अधिक व्ह्यूज

Stranger Things Season 4 : वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नेटफ्लिक्सवरील 'स्ट्रेंजर थिंग्स' (Stranger Things) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'स्ट्रेंजर थिंग्स'चा चौथा सीझन मात्र नेटफ्लिक्सचा आजवरचा सर्वात धमाकेदार सीझन ठरला आहे. हा सीझन हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू या भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

18:19 PM (IST)  •  20 Jun 2022

आर. माधवनच्या Rocketry: The Nambi Effect सिनेमाचे नवे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री:  नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला आहे. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (75th Cannes Film Festival) या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या महोत्सवातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 

18:19 PM (IST)  •  20 Jun 2022

बॉक्स ऑफिसवर शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' जोरदार आपटला, शो झाले रद्द

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि आग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू देसानीचा (Abhimanyu Dassani) 'निकम्मा' (Nikamma) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. सिनेमा चांगली कमाई करत नसल्याने निर्मात्यांनी या सिनेमाचे अनेक शो रद्द केले आहेत. 

16:38 PM (IST)  •  20 Jun 2022

मिकाच्या स्वयंवरात पहिल्याचं दिवशी भांडण

Swayamvar Mika Di Vohti :   प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. कालपासून (19 जून) या कार्यक्रमाला सुरुवात झाली. काल  'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला. या एपिसोडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिकाच्या स्वयंवरात आलेल्या दोन मुलींमध्ये भांडण झालेलं दिसत आहे. 

वाचा सविस्तर बातमी 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget