Netflix : नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये चर्चा; पाहा यादी
स्क्विड गेम (Squid Game) , ब्रिजटर्न सिझन वन (Bridgerton Season One) , स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things Season 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
Netflix Most Watched And Top Web Series : ओटीटीवरील वेब सीरिजला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. वेगवेगळ्या विषयांवरील तसेच वेगवेगळ्या भाषांमधील वेब सीरिज प्रेक्षक आवडीने पाहतात. या वेब सीरिजमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते. स्क्विड गेम (Squid Game), ब्रिजटर्न सिझन वन (Bridgerton Season One), स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things Season 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या वेब सीरिजला सर्वाधिक लोकांनी पाहिले आहे.
'स्क्विड गेम' (SQUID GAME)
सर्वांत चर्चेत असणारी वेब सीरिज म्हणजे 'स्क्विड गेम'. ब्लूमबर्गमधील इंटरनल रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजने आत्ता पर्यंतचे सर्व रेकोर्ड्स तोडले असून 900 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. ही वेब सीरिज तयार करण्यासाठी फक्त 21.4 मिलियन डॉलर एवढा खर्च झाला होता. 'स्क्विड गेम' या साउथ कोरियन वेब सीरिजला अनेकांनी पसंती दिली आहे. या सीरिजला ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) यांनी दिग्दर्शित केला आहे. या वेब सीरिजला 1.65 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
'स्ट्रेंजर थिंग्स' (STRANGER THINGS)
मिल्ली बॉबी ब्राउन (Millie Bobby Brown) आणि त्यांच्या टीमची 'स्ट्रेंजर थिंग्स' या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या जॉयस, नॅन्सी, डस्टिन, मॅक्स आणि माइक यांच्या संपूर्ण टीमची कथा दाखवण्यात आली आहे.
ब्रिजटर्न सिझन वन (Bridgerton Season One)
ब्रिजटर्न सिझन वन या वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 625.49 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
संबंधित बातम्या
'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha