Entertainment News Live Updates 2 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Budget 2023: अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष; मनोरंजन विश्वाकडून नाराजी व्यक्त
Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून विविध घोषणा करण्यात आली. पण मनोरंजनसृष्टी (Entertainment Sector) संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरंजनसृष्टीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या बजेटमध्ये मनोरंजनसृष्टी संदर्भात काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती पण यंदा मनोरंजनक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
Budget 2023: अर्थसंकल्पावर विवेक अग्रिहोत्री यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा अर्थसंकल्प अत्यंत...'
Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे कौतुक केले आहे.
SRK Jawaan Look Leaked: 'जवान' मधील शाहरुखचा लूक लीक; नेटकरी म्हणाले, 'हा पठाणपेक्षा जास्त...'
SRK Jawan Look Leaked: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खास आहे. कारण त्याचे आगामी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. 25 डिसेंबर रोजी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं सात दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. आता शाहरुखच्या डंकी (Dunki) आणि जवान (Jawan) या दोन आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. यामधील जवान या चित्रपटाच्या सेटमधील शाहरुखचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखचा चित्रपटातील लूक दिसत आहे.
#SRK back on the sets of #Jawan today in his monster avatar pic.twitter.com/jre8fun2mo
— Harminder 🍿🎬🏏 (@Harmindarboxoff) January 31, 2023
Milind Gawali: 'तेव्हाच मी ठरवलं, आयुष्यात कधीही राजकारणी व्हायचं नाही...'; आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळींची पोस्ट
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद हे सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच ते वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकत्याच एका पोस्टच्या माध्यमातून मिलिंद गवळी यांनी त्यांच्या बालपणीची आठवण चाहत्यांना सांगितली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
TDM: 'ख्वाडा' आणि 'बबन'च्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'टीडीएम' चं पोस्टर झालं रिलीज
TDM: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित, आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या ‘टीडीएम’ (TDM) चित्रपटाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, कारण येत्या 28 एप्रिल 2023 ला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
View this post on Instagram
Kedar Shinde: 'जय जय महाराष्ट्र माझा'चं दुसरं, तिसरं कडवंच राज्यगीत म्हणून गायलं जाणार; केदार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
Kedar Shinde: 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Majha) या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्य गीत म्हणून गायलं जाणार आहे. वेळेचा विचार करता गीत मोठं होत असल्यानं निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर राज्य गीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे. एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. आता या निर्णयावर केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
केदार शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला वाटतं की, राज्यगीत किंवा राष्ट्रगीताला काही प्रोटोकॉल असतात. आधी आपण राज्यगीत नाही म्हणून टाहो करत होतो. आता राज्यगीत आपल्याला मिळालं तर ते आपल्या प्रमाणे असावं, असं होऊ शकत नाही. किती सेकंदात किंवा किती मिनीटांमध्ये गाणं असावा हा प्रोटोकॉल असेल तर त्यामध्ये मला काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण राज्यगीत गाऊ, तेव्हा तीन कडवी गाऊयात. तीनच कडवी गायली जावीत, असा अट्टाहास नसावा.'
View this post on Instagram
Pathaan Box Office Collection Day 8: पठाणची जादू बॉक्स ऑफिसवर कायम; आठव्या दिवशीही कमावला कोट्यवधींचा गल्ला
Pathaan Box Office Collection Day 8: सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी (1 फेब्रुवारी) 18 कोटींची कमाई केली आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. लवकरच हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
#Pathaan early estimates for All-India Nett for Day 8 is around ₹ 18 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) February 2, 2023