Entertainment News Live Updates 14 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'लाल सिंह चड्ढा'च्या कमाईचा आकडा घसरला!
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण आता कलेक्शन पाहता या चित्रपटाला फारशी पसंती मिळत नसल्याचे लक्षात येत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ने पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'बिग बॉस मराठी 4' महेश मांजरेकरच होस्ट करणार
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्याने चौथा सीझन कोण होस्ट करणार आणि कोणते स्पर्धक या सीझनमध्ये सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आता कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'बिग बॉस मराठी 4'च्या सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत.
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लघुपटाची निर्मिती!
दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते 'कालजयी सावरकर' या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या 'कालजयी सावरकर' या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे आणि याचा मला आनंद वाटतो, अशी बोलकी प्रतिक्रिया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लघुपट संपल्यानंतर बोलताना दिली.
लोककलावंतांसाठी अजय-अतुल खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ!
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात अजय-अतुल लोककलावंतांसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळताना दिसणार आहेत.
एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा 'फौजी'; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त करतो. नंतर मात्र अगदी सहज विसरून जातो. आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा 'फौजी' हा सिनेमा आहे.
देशप्रेम जागवणारे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?
भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 75व्या वर्षी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ सारखा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोषात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टीव्हीवर अनेक देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात. इतकचं नाही तर, बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत, जे पाहणाऱ्या दर्शकाच्या मनात देशप्रेम जागृत करतात. चला तर, जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...
‘पुढचा नंबर तुमचा’, सलमान रश्दींना पाठिंबा देणाऱ्या ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांना धमकी!
भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने स्टेजवर चढून त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. अनेक सेलिब्रिटींनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला होता. त्यांनी सलमान रश्दींच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. तेव्हापासून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.
.@TwitterSupport These are your guidelines, right?
— J.K. Rowling (@jk_rowling) August 13, 2022
"Violence: You may not threaten violence against an individual or a group of people. We also prohibit the glorification of violence...
"Terrorism/violent extremism: You may not threaten or promote terrorism..." pic.twitter.com/BzM6WopzHa
इंद्रा-दीपूने घेतला प्रेक्षकांचा निरोप, ‘मन उडू उडू झालं’च्या कथेचा शेवट गोड!
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zhaal) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेने काल (13 ऑगस्ट) प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला आहे.
View this post on Instagram
आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, तिसऱ्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर (Kareena Kapoor-Khan) मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने सुरुवातीचे दोन दिवस फारच कमी कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. शनिवारी देखील या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे.
राकेश झुनझुनवालांचे बॉलिवूड कनेक्शन; 'या' तीन चित्रपटांची केली होती निर्मिती
शेअर बाजारातील बिग बुल असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Bollywood Connection) यांचा 'मिडास टच' बॉलिवूड चित्रपटांनाही लागला. राकेश झुनझुनवाला यांनी तीन बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती (Rakesh Jhunjhunwala Produce Movie) केली. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. राकेश झुनझुनवाला हे हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते.