Entertainment News Live Updates 10 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
सूर्याच्या आगामी सिनेमाची घोषणा; पोस्टर शेअर करत म्हणाला...
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या (Suriya) प्रत्येक सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अशातच सूर्याच्या आगामी 'सूर्या 42' (Suriya 42) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाचं मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आलं आहे. 'सूर्या 42' या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्याने चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. सूर्याचा 'जय भीम' हा सिनेमा गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील सूर्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. तसेच सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आता 'सूर्या 42' या सिनेमाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
डीसी देणार मार्वलला टक्कर; ड्वेन जॉनसनच्या 'ब्लॅक अॅडम'चा दमदार ट्रेलर रिलीज
अभिनेता ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) गेल्या अनेक दिवसांपासून 'ब्लॅक अॅडम' (Black Adam) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा ट्रेलर आऊट झाला आहे. 'ब्लॅक अॅडम'चा ट्रेलर खूपच रोमांचक आहे. एक सामान्य माणूस ते सुपरहिरोपर्यंतचा प्रवासाची झलक प्रेक्षकांना 'ब्लॅक अॅडम'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये अनेक ऐतिहासिक घटना दाखवण्यात आल्या आहेत. ट्रेलरमध्ये सुपरहिरोच्या चांगल्या वाईट घटना दाखवण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
‘रॅप किंग’चा घटस्फोट; 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने घेतला निर्णय
आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय गायक 'यो यो हनी सिंह'चा (Yo Yo Honey Singh) घटस्फोट झाला आहे. 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने पत्नी शालिनीसोबत घटस्फोट घेतला आहे. 2021 साली हनी सिंहवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला होता. हनीने शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप त्याची पत्नी शालिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. 2011 साली हनी सिंह शालिनीसोबत लग्नबंधनात अडकला होता. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांची लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आता लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
'ब्रम्हास्त्र'ला करावा लागतोय पायरसीचा सामना; रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता या सिनेमाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा एचडी क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. अनेक साईटवरून हा सिनेमा नेटकरी डाऊनलोड करत आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘केवळ दांडी यात्रेने स्वातंत्र्य नाही मिळालं...’, ‘कर्तव्यपथा’च्या उद्घाटनाला कंगनाचं वक्तव्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथा’चे (Kartavyapath) उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात देशातील अनेक नेते, कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतही (Kangana Ranaut) सामील झाली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी कंगनाने अनेक वक्तव्ये केली.
Brahmastra Box Office Collection : 'ब्रम्हास्त्र' वीकेंडला पार करणार 100 कोटींचा टप्पा
एकीकडे अनेक बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होत असताना 'ब्रम्हास्त्र' मात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
आलिया-रणबीरचा ब्रम्हास्त्र पाहा 75 रुपयांत
‘राष्ट्रीय सिनेमा दिनाचे औचित्य साधत 16 सप्टेंबरला तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रेक्षकांना सिनेमाच्या एका तिकिटासाठी फक्त 75 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे 16 सप्टेंबरला रणबीर आलियाचा ब्रह्मास्त्र फक्त 75 रुपयांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
सुबोध भावेने केली नव्या सिनेमाची घोषणा
अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करणार आहे. या सिनेमाचं नाव ‘निरवधी’ असं आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'चे आठवे पर्व होणार सुरू
Koffee With Karan 8 : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'कॉफी विथ करण 7' सुरू असतानाच या पर्वाच्या आठव्या पर्वाची (Koffee With Karan 8) घोषणा झाली आहे.
Brahmastra Collection : जगभरात 'ब्रह्मास्त्र'चा डंका!
'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीपासून (Ayan Mukerji) ते 'ब्रह्मास्त्र'च्या स्टारकास्टपर्यंतच्या सगळ्यांच्याच मेहनतीला यश आल्याचे दिसते आहे. पहिल्या दिवशीची कमाई पाहता या चित्रपटाने इतिहास रचल्याचे दिसते आहे. या चित्रपटाने जगभरात 75 कोटींची कमाई केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर एका चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करून दमदार कमाईला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. जे खरोखरच कौतुकास्पद आहे. अयान मुखर्जीने सोशल मीडियावर चित्रपटाची वर्ल्ड वाइड फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram