Entertainment News Live Updates 1 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2022 11:44 PM
'बदाम... बदाम... कच्चा बदाम' गाणं गाणाऱ्या भुवन बडायकरने केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण; रंगभूमीपासून करणार सुरुवात

काही दिवसांपूर्वी 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या गाण्यामुळे भुवन बडायकर चांगलाच लोकप्रिय झाला. आता भुवन बडायकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भुवनने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. भुवन आता प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाला आहे. 

येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बहुरूपी अशोक'

मराठी सिनेसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचा रविवार प्रेक्षकांसाठी खास आहे. रविवारी प्रेक्षकांना 'बहुरूपी अशोक' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 

Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा

'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. 'धर्मवीर' सिनेमा 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 दिवसदेखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या टीमने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Anek On Netflix : 'अनेक'ने 'भूल भुलैया 2'ला टाकलं मागे; नेटफ्लिक्सवर आयुष्मान खुराना अव्वल स्थानी

बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'अनेक' (Anek) हा सिनेमा नुकताच 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सध्या हा सिनेमा ट्रेडिंगमध्ये असून या सिनेमाने कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमालादेखील मागे टाकलं आहे.  





Mangesh Desai : "मी जवळून बघितलेला एक समाजकारणी मुख्यामंत्री झाला"; 'धर्मवीर'चा निर्माता मंगेश देसाईने दिल्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

'धर्मवीर'चा निर्माता मंगेश देसाईने (Mangesh Desai) खास पोस्ट लिहित एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. 





डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने चाहत्यांना दिली "डॉक्टर जी" ची खास भेट

डॉक्टर्स दिनानिमित्त, आयुष्मान खुरानाने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. त्याचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी'च्या टीमने चित्रपटातील त्याचा लूक सादर केला आहे. जंगली पिक्चर्स निर्मित हा चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप यांनी केले आहे. या कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत.

एक-दोन नव्हे तब्बल 22 कलाकारांसह हास्याचा बूस्टर डोस! 'झोलझाल' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

Zol Zaal : कोरोनाच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन ‘झोलझाल’ (Zol Zaal) हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित 'झोलझाल' हा चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी किती रुचकर असणार, हे आपण चित्रटातील ठसकेदार गाण्यांनी आणि चित्रपटाचा ट्रेलरने पहिलीच आहे.


मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या कमर्शिअल चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे, यांत शंकाच नाही. ‘झोलझाल’ या चित्रपटात तब्बल 22 कलाकारांनी मिळून जो काय गोंधळ घातलाय, तो खरंच पाहण्यासारखा आहे. एका महालाभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा, तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे कसे ‘झोलझाल’ करतंय हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आर्यन खानने ठोठावले कोर्टाचे दरवाजे, केली ‘ही’ मागणी!

Aryan Khan : क्रूझ ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) क्लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन (Aryan Khan) याने गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे.


मीडिया नुसार, आर्यन खानने 30 जून रोजी पासपोर्ट परत मिळावा यासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला NCB ने हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. परंतु, एनसीबीने मे महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नमूद केलेले नाही. या प्रकरणात त्याला नुकतीच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून (NCB) क्लीन चिटही मिळाली आहे. आपल्या याचिकेत आर्यनने न्यायालयाला विनंती केली आहे की, एनसीबीच्या आरोपपत्रात त्याचे नाव नाही, त्यामुळे त्याचा पासपोर्ट परत देण्यात यावा. या प्रकरणाबाबत विशेष न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी 13 जुलैला होणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...’, कंगना रनौतकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा!

Kangana Ranaut : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. 30 जूनला त्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील शुभेच्छा देत आहेत. आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देखील अंदाजात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.


कंगनाने केलं एकनाथ शिंदे यांचं कौतुक!


आता एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

घरातील नोकरानेच अभिनेत्रीला दिली जीवे मारण्याची धमकी, माही विजने सांगितली आपबिती

Mahhi Vij Death Threat: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि यशस्वी होस्ट जय भानुशालीच्या (Jay Bhanushali) पत्नीला अर्थात अभिनेत्री माही विजला (Mahi Vij) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी जय भानुशालीच्या घरी एक व्यक्ती काम करत होता, त्यानेच अभिनेत्याची पत्नी माही विजला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माहीने या घटनेचा व्हिडीओही बनवला आहे. माही विजने नुकतेच काही ट्विट केले होते, ज्यामध्ये तिने आपल्याला नोकराकडून धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर ते ट्विट माहीने डिलीट केले होते. मात्र, या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

‘तारक मेहता...’मध्ये ‘नट्टू काकां’ची वापसी! ‘हा’ अभिनेता साकारणार नट्टू काकांची भूमिका!

Taarak Mehta Ka ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके पात्र ‘नट्टू काका’ (Nattu Kaka) साकारणारे अभिनेते ​​घनश्याम नायक यांच्या निधनाला आता नऊ महिने पूर्ण झाले आहेत. मालिकेचे चाहते आता ‘नट्टू काका’ या पत्राला खूप मिस करत आहेत. मात्र, आता लवकरच ‘नट्टू काका’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नट्टू काका’ या पात्रासाठी निर्मात्यांना नवीन अभिनेता सापडला आहे. गुजराती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण भट्ट (Kiran Bhatt) आता या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार आहे.


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे निर्माते असित मोदी यांनी किरण भट्ट यांची ओळख करून देताना म्हटले की, ‘मला खात्री आहे की किरण या पात्राला नक्कीच न्याय देईल’. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक महिन्यांपासून नट्टू काकांशिवाय सुरू होता. पण, आता या शोमध्ये निर्मात्यांनी नवीन नट्टू काकांना आणले आहे. गुरुवारी शोच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

व्हिडीओ जॉकी म्हणून केली करियरची सुरुवात, अजूनही सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत रिया चक्रवर्ती!

Rhea Chakraborty Birthday : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आज (1 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिच्या अभिनयापेक्षा जास्त वादविवादांमुळे चर्चेत राहिली आहे. रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून जवळपास 10 वर्ष उलटली असून, अजूनही अभिनेत्री एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेतच आहे. 1 जुलै 1992 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'सोनाली केबल', ‘चेहेरे’, ‘जलेबी’, ‘बँक चोर’ यासारख्या हिंदी चित्रपटात दिसली. मात्र, रिया अजूनही बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत आहे.


रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती बंगाली आहेत, तर आई संध्या मूळची कोकणी आहे. तिने 2009मध्ये छोट्या पडद्यावरील रियॅलिटी शो MTV TVS Scooty Teen Diva मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ती या शोची विजेती होऊ शकली नव्हती. या स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यानंतर ती एमटीव्हीचे अनेक शो होस्ट करताना दिसली.


वाचा संपूर्ण बातमी 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


एकतर्फी प्रेमाची कथा घेऊन येतोय अर्जुन आणि जॉन... ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर आऊट


बॉलिवूडच्या बहुचर्चित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरचा हा सिनेमा एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.


'कोण होणार करोडपती'चा कर्मवीर विशेष भाग रंगणार शनिवारी


'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. या आठवड्यात  ‘कोण होणार  करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागात' कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत.


देशातच नाही तर विदेशातही 'भूल भुलैया 2' ब्लॉकबस्टर


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील नोन इंग्लिश विभागात या सिनेमाने जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. हा रेकॉर्ड करणारा हा पहिला हिंदी सिनेमा आहे.


‘कन्याकुमारी’ची लगीनघाई; वैशाली सामंतचा नवा अल्बम लवकरच होणार रिलीज


आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.


दिशा पाटणी अन् जॉन अब्राहमची जमली जोडी! ‘एक व्हिलन रिटर्न्स’चं धमाकेदार पोस्टर पाहिलंत का?


'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘एक व्हिलन’ हा चित्रपट तब्बल 8 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत.  या पोस्टरमध्ये दिशा पाटणी आणि जॉन अब्राहमचा जबरदस्त लूक दिसला आहे. त्यांचा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. यासोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.