Happy Birthday Rhea Chakraborty : व्हिडीओ जॉकी म्हणून केली करियरची सुरुवात, अजूनही सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत रिया चक्रवर्ती!
Rhea Chakraborty Birthday : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)आज (1 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे.
![Happy Birthday Rhea Chakraborty : व्हिडीओ जॉकी म्हणून केली करियरची सुरुवात, अजूनही सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत रिया चक्रवर्ती! Happy Birthday Rhea Chakraborty actress started her career as a video jockey, still waiting for the superhit movie Happy Birthday Rhea Chakraborty : व्हिडीओ जॉकी म्हणून केली करियरची सुरुवात, अजूनही सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत रिया चक्रवर्ती!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/869c7124d77ef9357eed02270a54c376_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rhea Chakraborty Birthday : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आज (1 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिच्या अभिनयापेक्षा जास्त वादविवादांमुळे चर्चेत राहिली आहे. रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून जवळपास 10 वर्ष उलटली असून, अजूनही अभिनेत्री एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेतच आहे. 1 जुलै 1992 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'सोनाली केबल', ‘चेहेरे’, ‘जलेबी’, ‘बँक चोर’ यासारख्या हिंदी चित्रपटात दिसली. मात्र, रिया अजूनही बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत आहे.
रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती बंगाली आहेत, तर आई संध्या मूळची कोकणी आहे. तिने 2009मध्ये छोट्या पडद्यावरील रियॅलिटी शो MTV TVS Scooty Teen Diva मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ती या शोची विजेती होऊ शकली नव्हती. या स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यानंतर ती एमटीव्हीचे अनेक शो होस्ट करताना दिसली.
‘या’ अभिनेत्याशीही जोडले गेले नाव!
यानंतर रियाने 'बँड बाजा बारात' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. पण, यातील भूमिकेसाठी तिला नकार मिळाला. पुढे याच चित्रपटामध्ये अनुष्का शर्माची निवड झाली आणि तिने बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले. रिया आयुष्मान खुरानासोबत 'ओये हीरीये' या म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे. सुशांत सिंह राजपूतला डेट करण्यापूर्वी रियाचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतही जोडले गेले आहे. दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही.
अशी सुरु झाली रिया-सुशांतची लव्हस्टोरी!
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतची पहिली भेट 2013मध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यावेळी तो 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यावेळी सुशांत दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, तरीही तो रियाच्या संपर्कात होता. यानंतर, रिया आणि सुशांतने एकमेकांचे नंबर घेतले आणि त्यांच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. मात्र, सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आणि नंतर या प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नाव समोर आहे.
हेही वाचा :
Rhea Chakraborty : एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोपपत्र
Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)