Anek OTT Release : आयुष्मान खुरानाचा 'अनेक' नेटफ्लिक्सवर रिलीज; ट्वीट करत दिली माहिती
Anek : आयुष्मान खुरानाचा 'अनेक' सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहू शकतात. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
Anek OTT Release : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'अनेक' (Anek) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमागृहात फारशी जादू दाखवू न शकलेला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 'अनेक' हा सिनेमा प्रेक्षक आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
नेटफ्लिक्सवर रिलीज झाला 'अनेक'
'अनेक' हा सिनेमा सिनेमागृहात फारशी जादू दाखवू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. त्यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती नेटफ्लिक्सने ट्वीट करत प्रेक्षकांना दिली आहे. या सिनेमातील आयुष्मान खुरानाच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
'अनेक' बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप
आयुष्मान खुरानाच्या 'अनेक'चे बजेट 80 कोटी होते. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळेच हा सिनेमा फ्लॉप झाला. 27 मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आत हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 12 कोटींची कमाई केली होती.
Ek thriller, thrill anek.
— Netflix India (@NetflixIndia) June 26, 2022
Anek is now streaming on Netflix! pic.twitter.com/VxMd50evwZ
अनुभव सिन्हाने 'अनेक' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा आधी 31 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. 'अनेक' सिनेमात आयुष्मान खुराना जोशुआची भूमिका साकारत आहे. या सिनेमानंतर आयुष्मान अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या 'डॉक्टर जी' सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा 17 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
Anek OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आयुष्मान खुरानाचा 'अनेक' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज
Anek Box Office Collection : 'भूल भुलैय्या-2' समोर टिकू शकला नाही आयुष्मानचा 'अनेक'; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई
Anek, The Kapil Sharma Show : आयुष्मान खुरानासह ‘अनेक’ची टीम कपिल शर्माच्या सेटवर! शेअर केले शूटिंगचे धमाल किस्से...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
