Taarak Mehta Ka ooltah Chashmah : ‘तारक मेहता...’मध्ये ‘नट्टू काकां’ची वापसी! ‘हा’ अभिनेता साकारणार नट्टू काकांची भूमिका!
Taarak Mehta Ka ooltah Chashmah : मालिकेचे चाहते ‘नट्टू काका’ या पत्राला खूप मिस करत आहेत. मात्र, आता लवकरच ‘नट्टू काका’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Taarak Mehta Ka ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके पात्र ‘नट्टू काका’ (Nattu Kaka) साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांच्या निधनाला आता नऊ महिने पूर्ण झाले आहेत. मालिकेचे चाहते आता ‘नट्टू काका’ या पत्राला खूप मिस करत आहेत. मात्र, आता लवकरच ‘नट्टू काका’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नट्टू काका’ या पात्रासाठी निर्मात्यांना नवीन अभिनेता सापडला आहे. गुजराती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण भट्ट (Kiran Bhatt) आता या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे निर्माते असित मोदी यांनी किरण भट्ट यांची ओळख करून देताना म्हटले की, ‘मला खात्री आहे की किरण या पात्राला नक्कीच न्याय देईल’. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक महिन्यांपासून नट्टू काकांशिवाय सुरू होता. पण, आता या शोमध्ये निर्मात्यांनी नवीन नट्टू काकांना आणले आहे. गुरुवारी शोच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
नवे नट्टूकाका प्रेक्षकांच्या भेटीला!
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी शोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘तुम्ही आमच्यावर आणि नट्टू काकांवर केलेल्या उदंड प्रेमाबद्दल धन्यवाद. पुढेही हे प्रेम असेच सदैव ठेवा. आता आम्ही नवीन नट्टू काका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. आज रात्री 8:30 वाजता त्यांना भेटा आणि तारक मेहता का उल्टा चष्मा पाहत रहा.’
पाहा पोस्ट :
या मालिकेमध्ये नट्टू काकांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक साकारत होते. 3 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या 77व्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. तेव्हापासून या शोमधून नट्टू काकांची व्यक्तिरेखा गायब आहे. आता निर्मात्यांनी घनश्याम नायक यांच्याजागी ज्येष्ठ रंगकर्मी किरण भट्ट यांची नट्टू काकांच्या भूमिकेसाठी निवड केली आहे. एका मुलाखतीत किरण यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, ‘जुन्या नट्टू काकांच्या नवीन नट्टू काका येत आहेत. माझा प्रिय मित्र घनश्यामची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. ही माझ्यासाठी खूप भावनिक भूमिका आहे. आशा आहे की, मी घनश्यामच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन.’
हेही वाचा :