Kangana Ranaut : ‘एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...’, कंगना रनौतकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा!
Kangana Ranaut : महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
Kangana Ranaut : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. 30 जूनला त्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील शुभेच्छा देत आहेत. आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देखील अंदाजात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.
कंगनाने केलं एकनाथ शिंदे यांचं कौतुक!
आता एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
कंगनाने इंस्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘किती अद्भुत प्रेरणादायी यशोगाथा आहे. उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत, सरांचे अभिनंदन!’ असे या फोटोवर लिहिले आहे. अभिनेत्री कंगना रनौत वेळोवेळी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत होती. अनेकवेळा तिने सरकारच्या निर्णयांवर टीकाही केली होती.
उद्धव ठाकरेंवर केली टीका!
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक व्हिडीओ शेअर करुन शिवसेना आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर मत व्यक्त केलं आहे. कंगनाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, '1975 नंतर आता ही वेळ भारताच्या लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची वेळ आहे. 1975 मध्ये लोकनेते जे. पी. नारायण यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर सरकार पडले होते. 2020मध्ये मी सांगितलं की, लोकशाही हा एक विश्वास आहे. सत्तेच्या अहंकारामध्ये येऊन जे लोक हा विश्वास मोडतात, त्यांचा अहंकार तुटणं देखील निश्चित आहे. ही खऱ्या चरित्राची शक्ती आहे. हनुमान हा भगवान शिवाचा बारावा अवतार मानला जातो. जर, शिवसेनाच हनुमान चालिसा बॅन करत असेल, तर त्यांना शिव देखील वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जय हिंद, जय महाराष्ट्र'. या व्हिडीओला कंगनाने कॅप्शन दिले की, 'जेव्हा पाप जास्त होते, तेव्हा विनाश होतो आणि नंतर नवं निर्मिती होते. नंतर जीवनाचे कमळ देखील फुलते.'
हेही वाचा:
Kangana Ranaut : 'त्यांना शिव देखील वाचवू शकत नाही....'; कंगनाचा शिवसेनेला टोला