Entertainment News Live Updates 09 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
![Entertainment News Live Updates 09 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर! Entertainment News Live Updates 09 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/09/7e641bb875cdc4831eeac41459a8ea6c1683608810550259_original.jpg)
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Priya Bapat: 'मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं?'; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रियाचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक नेटकरी तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. प्रिया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच प्रियानं वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
The Kerala Story: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी'ला शबाना आझमींचा सपोर्ट; ट्वीट शेअर करत म्हणाल्या...
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट काल (5 मे) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. या चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्ररटाला ट्वीट शेअर करुन सपोर्ट केला आहे.
TMKOC : प्रतीक्षा संपली! अखेर 15 वर्षांनी टप्पू सोनूला प्रपोज करणार
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Latest Update : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. मालिकेत टप्पू सोनूला कधी प्रपोज करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मालिकेच्या आगामी भागात टप्पू सोनूला प्रपोज करणार आहे.
Arijit Singh: छत्रपती संभाजीनगरमधील कॉन्सर्टदरम्यान अरिजित सिंहला झाली दुखापत; चाहत्यानं ओढला हात, व्हिडीओ व्हायरल
Arijit Singh: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) हा त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अरिजित विविध शहरांमध्ये कॉन्सर्टसाठी जात असतो. अरिजितचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) अरिजितच्या लाईव्ह कॉन्सरचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टदरम्यान एक घटना घडली. अरिजितच्या एका चाहत्यानं त्याचा हात ओढला. यामुळे अरिजित जखमी झाला आहे. या कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॉन्सर्टमध्ये ज्या फॅननं अरिजितचा हात ओढला त्या फॅनसोबत अरिजित बोलत आहे.
Arijit Singh was injured during his concert in Aurangabad after a fan of his pulled his hand. #ArijitSingh #ArijitSinghLive #Arijit #Injured #viralvideo #ViralVideos #viral2023 #India pic.twitter.com/XVVqz0n1CC
— Anjali Choudhury (@AnjaliC16408461) May 8, 2023
The Kerala Story: MP नंतर आता UP मध्ये 'द केरळ स्टोरी' होणार करमुक्त; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे पण काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पण काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात करमुक्त करण्यात आला. आता लवकरच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे. याबाबत उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एक ट्वीट शेअर करुन घोषणा केली आहे.
'The Kerala Story' उत्तर प्रदेश में टैक्स फ्री की जाएगी।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 9, 2023
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'वरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, 'लाज वाटायला हवी...'
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. पण या चित्रपटावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी या चित्रपटावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96… pic.twitter.com/86TZ8nnGK2
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2023
‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून मांडलेला धर्मांतरासारखा मुद्दा सत्य घटनेकडे डोळेझाक करणा-या जितेंद्र आव्हाडांना गंभीर वाटत नसेल तर त्यांनाच लाज वाटायला हवी…@Awhadspeaks यांच्या आत्ता पर्यंतच्या भूमिका यात खतपाणी घालणा-याच आहेत..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 9, 2023
मुळात त्यांना एवढा पुळका येण्याचं कारण समजू शकते… pic.twitter.com/YL7efNJaIm
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)