एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 09 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 09 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Gumraah : अंगावर शहारे आणणारा 'गुमराह'चा टीझर रिलीज

Aditya Roy Kapur Gumraah Teaser Out : बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सध्या 'द नाइट मॅनेजर' (The Night Manager) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच त्याच्या आगामी 'गुमराह' (Gumraah) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे. 

Aaliya Siddhiqui : आलियाने पुन्हा नवाजुद्दीन सिद्दीकीवर केले गंभीर आरोप

Aaliya Siddhiqui On Nawazuddin Siddhiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddhiqui) सध्या चर्चेत आहे. पत्नी आलियाने (Aaliya Siddhiqui) नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्याने ट्वीट करत या आरोपांवर मौन सोडलं. आता आलिया पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. आलिया म्हणाली,"नवाज खरं बोलला असता तर त्याने न्यायालयात त्याच्या बॅंक अकाऊंट स्टेटमेंट सादर केले असते". 

Sonalee Kulkarni : 'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

Sonalee Kulkarni On International Womens Day : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान आज जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे. 

Drishyam 3 : 'दृश्यम 3'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार

Drishyam 3 : 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे या सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल (Mohanlal) सध्या 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमावर काम करत आहे. 

15:47 PM (IST)  •  09 Mar 2023

Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार, 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानं काल (9 मार्च) भारतात 7.85 कोटींची कमाई केली. ओपनिंग-डेच्या कमाईत 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानं  अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटाला आणि कार्तिक आर्यनच्या शेहजादा या चित्रपटाला मागे टाकले आहे. सेल्फी या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.30 कोटींची कमाई केली होती तर शेहजादा या चित्रपटानं 2.92 कोटींची कमाई ओपनिंग-डेला केली.

15:45 PM (IST)  •  09 Mar 2023

Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत होणार अंत्यसंस्कार; कुटुंबियांची माहिती

Satish Kaushik Passes Away:  अभिनेते   सतीश कौशिक  (Satish Kaushik) यांच्या निधाननं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सतीश यांच्या पार्थिवावर आज मुंबईमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. सतीश यांच्या कुटुंबानं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्राकामध्ये लिहिलं आहे की, सतीश यांच्या पार्थिवावर 5 वाजता अंधेरी (Andheri) येथील हिंदू स्माशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 'सतीश आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा' असंही या पत्रकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. सतीश यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सतीश यांच्या वर्सोवा येथील घरी गेले आहेत.

13:08 PM (IST)  •  09 Mar 2023

Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांचे निधन; अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त

Satish Kaushik Passes Away: 'अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक सतीश कौशिक यांच्या  निधनाने खूप दुःख झाले. भारतीय चित्रपट, कलात्मक निर्मिती आणि अभिनयातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती शांती.' असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे. 

13:06 PM (IST)  •  09 Mar 2023

Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली; शेअर केलं ट्वीट

Satish Kaushik Passes Away: "प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक जी यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शनामुळे मन जिंकले. त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती." असं ट्वीट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. 

12:11 PM (IST)  •  09 Mar 2023

Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी सतीश कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली

Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी ट्वीट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  'सतीशला मी जवळजवळ चाळीस वर्षांपासून ओळख होतोय तो माझ्या भावासारखा होता. तो माझ्यापेक्षा बारा वर्षांनी लहान होता.'

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget