एक्स्प्लोर

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे.

Maharashtra Shahir Box Office Collection : 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. रिलीजच्या सहा दिवसांत या मराठी सिनेमाने 3.33 कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (Maharashtra Day 2023) या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 

'महाराष्ट्र शाहीर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Maharashtra Shahir Box Office Collection Day 6)

'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या मराठी सिनेमाने 0.3 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाने 0.55 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 0.8 कोटी कमावले. चौथ्या दिवशी अर्थात 'महाराष्ट्र दिना'च्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाने एका दिवसात 1.03 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी 0.34 कोटी आणि सहाव्या दिवशी 0.31 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

शाहीर साबळे (Shahir Sable) यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदेने (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Choudhary) शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने (Sana Shinde) या सिनेमात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. अजय-अतुल यांनी या सिनेमातील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकांकडून 'महाराष्ट्र शाहीर'चं कौतुक

'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचं राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत. अंकुश चौधरीचा दर्जेदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर सना शिंदेने या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर जपणारे, मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. 

शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची निर्मिती करण्याचा घाट केदार शिंदेंनी घातला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमासाठी अंकुशने खूप मेहनत घेतली आहे. 

संबंधित बातम्या

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्दMumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीरPanchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्दMumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
Embed widget