(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment : IMDb द्वारे 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा; पाहा चित्रपटांची यादी
Entertainment News : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.
Entertainment News : अनेकदा चित्रपटाचे रिव्ह्यू वाचून, किंवा लोकांशी संवाद साधून नाहीतर मग तो चित्रपट स्वत: पाहून इतरांना सांगणे हे बऱ्याचदा होत असते. पण प्रेक्षकांनी कोणते सिनेमे पाहावेत. कोणत्या सिनेमांबाबत उत्सुकता आहे. याबाबत IMDb माहिती देते. IMDb च्या मासिक 20 कोटी यूजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.
IMDb ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीज संदर्भातील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोताद्वारे आज 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा केली गेली. पूर्ण 2022 मधील IMDb यूजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी निर्धारित केली आहे.
IMDb ची 2023 ची सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे :
1. पठान
2. पुष्पा: द रूल- पार्ट 2
3. जवान
4. आदिपुरुष
5. सलार
6. वेरीसू
7. कब्ज़ा
8. थलापथी 67
9. द आर्चीज
10. डुंकी
11. टायगर 3
12. किसी का भाई किसी की जान
13. थुनिवू
14. एनिमल
15. एजंट
16. इंडियन 2
17. वादीवासाल
18. शेहज़ादा
19. बडे मियाँ छोटे मियाँ
20. भोला
2023 मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी हे 20 चित्रपट 2022 मध्ये IMDb च्या मासिक 20 कोटी यूजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार सातत्याने सर्वाधिक प्रसिद्ध होते. हे चित्रपट केव्हा उपलब्ध होतील ह्याबद्दल अलर्ट मिळवण्यासाठी IMDb यूजर्स हे आणि इतर टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर add करू शकतात.
2023 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीतील हे उल्लेखनीय चित्रपट :
हिंदी फिल्म्स ह्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये प्रामुख्याने 11 हिंदी चित्रपट, 5 तामिळ, 3 तेलुगु आणि 1 कन्नडा अशा चित्रपटांचा समावेश आहे.
तीन वर्षांनंतर शाहरूखची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरूख खान तीन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पठान, जवान आणि डुंकी हे शाहरूखचे आगामी चित्रपट आहेत. इतकेच नाही तर, शाहरूखची मुलगी सुहाना खानसुद्धा झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज या चित्रपटांतून सिनेमात पदार्पण करणार आहे. हा चित्रपटसुद्धा ह्या यादीत 9 व्या स्थानी आहे.
सुपरस्टार सलमान खानचेही ह्या यादीन दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. यापैकी किसी का भाई किसी की जान आणि टायगर3 अशी या चित्रपटांची नावं आहेत.
शेहजादामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे आणि हाही एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. तर 'भोला'मध्ये अजय देवगन प्रमुख भुमिकेत आहे तसेच हा 2019 चा तामिळ चित्रपट 'कैथी'चा रिमेक आहे.
IMDb हा चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगामधील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत आहे. काय बघावे आणि कुठे बघावे ह्याचा निर्णय घेण्यासाठी चाहत्यांना मदत करणारी ही एक साईट आहे.
महत्त्वाच्या बातम्या :