Oscars 2023: द कश्मीर फाईल्स ते मी वसंतराव; 'हे' चित्रपट ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत; 25 जानेवारीला नामांकनाची यादी होणार जाहीर
जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट ऑस्करनं (Oscars 2023) जाहीर केली आहे. ऑस्करनं जाहीर केलेल्या या यादीत बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांच्या नावांचा सामावेश आहे.
Oscars 2023: ऑस्करनं (Oscars 2023) जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे. अवतार- द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water), भारतातील कांतारा (Kantara), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) 'मी वसंतराव' (Me Vasantrao) , तुझ्यासाठी काहीही (Tujhya Sathi Kahi Hi) या सिनेमांच्या नावांचा समावेश ऑस्करनं जाहीर केलेल्या रिमाइंडर लिस्टमध्ये झाला आहे.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून द छेल्लो शो हा गुजराती सिनेमा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या नामांकनासाठी अनेक सिनेमांमध्ये शर्यत असणार आहे. द कश्मिर फाईल्स, कांतारा, मी वसंतराव, तुझ्यासाठी काहीही, आरआरआर, गंगूबाई काठियावाडी, रॉकेट्री आणि विक्रांत रोना हे सिनेमे नामांकनाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, नामांकनाची अंतिम यादी 25 जानेवारीला जाहीर होणार आहे.
द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ऑस्करच्या रिमांडर लिस्टमध्ये द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा समावेश झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'द कश्मीर फाईल्स हा चित्रपट ऑस्कर 2023 च्या पहिल्या यादीमध्ये शॉर्टलिस्टेड झाला आहे. हा भारतातील शॉर्टलिस्टेड झालेल्या पाच चित्रपटांपैकी एक आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. हे वर्ष भारतीय सिनेमासाठी अत्यंत खास आहे.'
BIG ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles has been shortlisted for #Oscars2023 in the first list of @TheAcademy. It’s one of the 5 films from India. I wish all of them very best. A great year for Indian cinema. 🙏🙏🙏
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 10, 2023
95 वा अकादमी पुरस्कार 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित केला जाईल. टीव्ही प्रेझेंटर जिमी किमेल यंदा ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान या चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळालेले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: