Adinath Kothare: 'शुटसाठी उठायचो पण कधीच पाणी नसायचं..'आदिनाथ कोठारेनं सांगितला चित्रिकरणाचा किस्सा, म्हणाला, 'आम्ही सगळे कुलरच्या पाण्यात..'
पाणी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये 18 ऑक्टोबर पासून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला आहे.
Adinath Kothare: मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या समस्येवर भाष्य करणारा 'पाणी' चित्रपट शुक्रवारपासून (18 October) सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. सिने इंडस्ट्रीतील तीन दिग्गज प्रोडक्शन हाऊस पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आदिनाथ कोठारे च दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा, डॉक्टर मधु चोप्रा व नेहा बडजाता यांनी केली आहे. दरम्यान पाणी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आदित्य कोठारे आणि ऋचा वैद्यने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला.
काय म्हणाला आदिनाथ कोठारे?
मराठवाड्याच्या पाण्याच्या समस्येवर आधारित असणार हा चित्रपट करताना आनंद झाल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला, मराठवाडा असल्याने तिथे पाण्याची समस्या होणार. तिथे नळाला सारखं सारखं पाणी येत नाही हे माहित आहे. जेव्हा मी सकाळी चित्रीकरणासाठी उठायचो तेव्हा कधीच नळाला पाणी नसायचं. मग आम्ही सगळे कुलरच्या पाण्यात आंघोळ करून शूटिंगला जायचो. असे तो म्हणाला.
मराठवाड्यातील माणसांचं आयुष्य जगलो
पाणी चित्रपटासाठी मराठवाड्यात करण्यात आलेल्या चित्रीकरणादरम्यान आदिनाथ कोठारे आणि त्याची संपूर्ण टीम मराठवाड्यातील माणसाचा आयुष्य जगले असं तो म्हणाला. आम्ही मराठवाडा आणि मराठवाड्यातील माणसांचा आयुष्य जगत होतो. बघत होतो. अनुभवत होतो. तो अनुभवच आम्हा सगळ्या कलाकारांमध्ये रुजत होता. या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोन्सने सांगितले की, 'पाणी’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. या चित्रपटातून अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळणार आहोत. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे प्रियांकाने सांगितले. आदिनाथचे दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय असून या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार मानत असल्याचे प्रियांकाने सांगितले.
समद्या गावच्या दारात पाणी आनेन..
पाणी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये 18 ऑक्टोबर पासून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करत आदिनाथ कोठारे याने समद्या गावाच्या दारात पानी आनेन .. तुम्ही थांबाल का मयतासाठी तवर ? पाणी चित्रपटाचा ट्रेलर आलाय!! आता पाण्याचा घूमे नाद !!! असं लिहीत एक instagram पोस्ट केली आहे .
View this post on Instagram
काय आहे सिनेमाची स्टारकास्ट ?
पाणी चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य या दोघांच्या प्रमुख भूमिकांसह सुबोध भावे , रजीत कपूर , किशोर कदम , नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी , श्रीपाद जोशी , विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे .