एक्स्प्लोर

big boss marathi: बिगबॉसच्या घरात खायला या 3 गोष्टीच मिळायच्या, अभिजीतनं शेअर केला व्हिडिओ, म्हणाला..

बिगबाॅसच्या घरात जेवण बनवण्याचा मुद्दा अनेकदा गाजला. जेवण बनवण्याच्या प्रक्रीयेत अभिजीतचाही सहभाग असायचा.

Big Boss Marathi: बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन आता संपला आहे. रितेश देशमुख होस्ट असलेल्या या शोची यंदा मोठी चर्चा होती. या शोमध्ये 16 सुप्रसिद्ध स्पर्धक यंदा सहभागी होते.  अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ग्रँड फिनालेमधला पहिला उपविजेता ठरला, त्याने संपूर्ण सीझनमध्ये त्याच्या मजबूत गेमप्लेने आणि दृढनिश्चयाने चाहत्यांना प्रभावीत केले. माजी इंडियन आयडॉल विजेते म्हणून, बिग बॉसच्या घरातील सावंतचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता, परंतु तो सातत्याने त्याच्या संतुलित वर्तनासाठी आणि स्पर्धात्मक भावनेमुळे नावाजला गेला. नुकताच त्यानं घरी परत आल्यानंतर सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात घराचा नाश्ता खात त्यानं बिगबॉसच्या घरातली एक आठवण सांगितलीय.

बिगबाॅसच्या घरात जेवण बनवण्याचा मुद्दा अनेकदा गाजला. जेवण बनवण्याच्या प्रक्रीयेत अभिजीतचाही सहभाग असायचा. बिग बॉसच्या घरात अनेकदा खाण्याचे वांदे झाल्यानंतर या स्पर्धकांनी घरी येऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारल्याचं दिसतंय. अलिकडेच त्यानं चहात मालपुवा बुडवून खाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्यानं बिगबॉसच्या घरात नाश्त्याला कोणते तीन पदार्थ फिक्स असायचे याविषयी सांगितलं आहे.

काय म्हणाला अभिजीत?

सत्तर दिवसांनी घरी परतल्यावर अभिजित सावंतनं घरच्या आवडीच्या चहा आणि मालपूवावर आवडीनं ताव मारल्याचं दिसलं. खूपच भारी वाटतंय असं तो म्हणाला. नाश्त्याला पोह्यांऐवजी काहीतरी दुसरं खायला मिळालं त्यामुळं बरं वाटतंय. नाहीतर आम्ही सारखे पोहेच खायचो असं म्हणत त्यानं बायकोच्या हातचा नाश्ता फस्त केल्याचं दिसलं.यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

काय होते ते तीन पदार्थ?

बिगबॉसच्या घरात आमचे तीन पदार्थ फिक्स असायचे असं सांगत अभिजीतनं बिगबॉसची आठवण सांगितली. खूप दिवसांनी ताटात पोह्यांशिवाय दुसरं काहीतरी पाहून खूप बरं वाटतंय. नाहीतर आम्ही सारखे पोहेच खायचो. पोहे, फोडणीचा भात आणि अंडी या तीन गोष्टी आमच्या फिक्स असायच्या सकाळी. आज मालपुवा खाताना बरं वाटतंय. चहामंध्य मालपूवा बुडवून खाण्याची मजा काही औरच असल्याचं अभिजीत म्हणाला.

View this post on Instagram
 
A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

नेटकऱ्यांच्या गोड प्रतिक्रीया

मालपूवा आणि चहाचा आस्वाद घेणाऱ्या अभिजीतनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी गोड प्रतिक्रीया दिल्या आहेत. निक्की तांबोळीनं या व्हिडिओखाली मला पण पाहिजे अशी कमेंट टाकली आहे. तर काहीनी वहिनी चांगले लाड करा आता. खाऊ पिऊ घाला सुकलाय तो... असं म्हटलंय.  अनेकांनी तु जिंकला नाहीस याचं आश्चर्य वाटत असल्याचंही लिहीलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Embed widget