(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhul bhulaiiya 3: कौन बनेगाच्या सेटवर कार्तिक झाला नर्व्हस, विद्यानं सांगितला मजेशीर किस्सा, बिग बीही म्हणाले...
हिंदी फिल्म विश्वातील उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन आणि सुंदर आणि दमदार अभिनेता कार्तिक आर्यन असं म्हणत बीग बींनी विद्या आणि कार्तिकचं कौन बनेगा करोडपतीमध्ये स्वागत केल्याचं दिसलं.
Bhul Bhulaiiya 3 : सध्या कार्तिक आर्यन आणि विद्या बालनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'भूल भूलैय्या 3' चं जोरदार प्रमोशन सुरु आहे. आता या चित्रपटाची क्रेझ बिगबींच्या कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर गेल्याचं दिसलेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलिज झाला आहे. यात बॉलिवूडचे सुपरस्टारचे दिग्गज होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत हलक्या फुलक्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
कार्तिक आणि विद्या यांच्यातील केमिस्ट्री या प्रोमोत स्पष्ट दिसत आहे. या एपिसोडच्या प्रोमोची सुरुवात विद्या बालन आणि कार्तिक आर्यनच्या एका संभाषणातून सुरु होते, ज्यात रुह बाबाला कौन बनेगा करोडपतीमध्ये जाण्याआधी टेन्शन आलेलं असतं. मग विद्या त्याला काही प्रश्न विचारते. थट्टा मस्करीनंतर कौन बनेगा करोडपतीचं लोकप्रीय पार्श्वगायन वाजतं आणि बिग बींची एन्ट्री होते.. धावत धावत आलेल्या बिग बींच्या एन्ट्रीवर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतो. बिगबींच्या नावाचा जयघोष होतो आणि कौन बनेगा करोडपतीच्या 50 व्या एपिसोडला सुरुवात होते.
.विद्या कार्तिकचं बिग बींनी केलं स्वागत
हिंदी फिल्म विश्वातील उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन आणि सुंदर आणि दमदार अभिनेता कार्तिक आर्यन असं म्हणत बीग बींनी विद्या आणि कार्तिकचं कौन बनेगा करोडपतीमध्ये स्वागत केल्याचं दिसलं. त्या दोघांचंही आगत्यानं स्वागत करत त्यांना हॉटसिटवर त्यांनी बसवलं. यावेळी कार्तिकच्या नर्वसनेसवर विद्यानं बिगबींना कार्तिकचा किस्सा सांगितला.
कार्तिक झाला नर्व्हस, विद्यानं सांगितला किस्सा
कार्तिक कौन बनेगा करोडपतीमध्ये प्रमोशनसाठी जाण्याचं कळल्यापासून आपण केबीसी मध्ये जाणार आता सरांसमोर कसे करायचे? कसे वागायचे असं तो सारखं विचारत असल्याचं सांगत विद्यानं कार्तिकची मजा घेतली. यावर आम्ही 'विद्या' ला घेऊन आलोय असं म्हणत आता सगळं तिच्याच हाती असल्याचं तो म्हणाला. यावेळी विद्यानं कार्तिक सायन्स स्टूडंट असल्याचं सांगितलं. यावेळी या दोघांनाही होस्ट अमिताभ बच्चन यांनी भूल भूलैय्या ३ साठी शुभेच्छा दिल्या.
दिवाळीत रिलिज होणार भूल भूलैय्या ३
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भुल भुलैया 3 चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीचा आगामी भुल भुलैया 3 चित्रपट दिवाळीमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाह मिळताना दिसत आहे. चित्रपटातील गाणंही लवकरच रिलीज होणार असून त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.