Bigg Boss 18: रजत आरफीन आमनेसामने, एकमेकांवर कुरघोडी करत कोण होणार बिग बॉसचा नवा टाईम गॉड?
बिग बॉसच्या टाईम का तांडवमध्ये घरासाठी नव्या टाईमगॉडसाठी निवडणूक होणार आहे. यात घरातील स्पर्धकांना नव्या टाईम गॉडला निवडून द्यायचे आहेत.
Bigg Boss 18: सलमान खानचा बिग बॉस १८ हा सिझन त्याच्या पहिल्या प्रीमियरपासूनच चर्चेत आहे. यात बिग बॉसनं रजत दलाल आणि आरफीन खानला आमने सामने आणत स्पर्धक बनवलं होतं. 'टाईम का तांडव' असे या स्पर्धेचे नाव होते. गेल्या आठवड्याचा टाईम गॉड आरफीन खान यांना करण्यात आलं होतं. आठवडयाभरानंतर आता बिगबॉसच्या घराला नवा टाईमगॉड निवडण्यात येणार आहे. यासाठी बिगबॉसच्या घरातही निवडणूका होणार आहेत. रजत दलाल आणि आरफीन खान यांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढायचे आहेत. याचा एका प्रोमो नुकताच कलर्स टीव्हीनं पोस्ट केला आहे.या प्रोमोमध्ये जर तुम्ही सत्तेत आलात तर तुम्ही हुकुमशाही कराल असं विवियन म्हणताना दिसला. आता तो हे नक्की कोणाला म्हणाला? हे टाईम गॉडच्या नव्या एपिसोडमध्येच दिसणार आहे.
काय आहे प्रोमोमध्ये?
बिग बॉसच्या टाईम का तांडवमध्ये घरासाठी नव्या टाईमगॉडसाठी निवडणूक होणार आहे. यात घरातील स्पर्धकांना नव्या टाईम गॉडला निवडून द्यायचे आहेत. यासाठी दोन स्पर्धक आमनेसामने आहेत. रजत दलाल आणि आरफीन खान हे या प्रोमोमध्ये आपापला प्रचार करत आहेत. एकमेकांवर दोषारोप करतानाही हे दोन स्पर्धक दिसत आहेत.
View this post on Instagram
आरफीननं दुसऱ्यांकडून काम करून घेतलं
आरफीन खान मागील आठवड्यात टाईम गॉड होता. तेंव्हा त्यानं स्वत: कोणतंच काम केलं नाही. सगळं काम दुसऱ्यांकडून करून घेतलं. असा आरोप रजतनं केला. तर हा जर टाईम गॉड झाला तर कसं चालेल. हा अर्धावेळ झोपणार.. असं अरफीन म्हणला. मी नेता झालो तर नेत्यांसारखे निर्णय घेईन असं रजत म्हणाला. टाईम का तांडव ही लढत दोन स्पर्धांमध्ये होणार असून रजत दलाल आणि विवियन या दोघांना आमने-सामने बसवण्यात आले होते. या दोघांपैकी कोण अधिक सक्षम आहे यावर घरातील स्पर्धकांना कारणासहित हात वर करायचा होता.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया कोणाच्या बाजूला?
ना रजत ना करण..विवियनच ठीक आहे असं काहीजण म्हणालेत. अनेक जण विवियनवर इंप्रेस झाल्याचं दिसत आहे. माझा सपोर्ट विवियनला असं अनेक जणांनी लिहिलं आहे. एकानं रजतला आपला पाठिंबा दिलाय तर काहींनी रजतला केवळ अहंकार आहे. त्याला काही येत नाही असंही म्हणलंय.