(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ekdam Kadam Marathi Movie : कॉलेजलाईफ अनुभवणाऱ्या तरुणाईंचा 'एकदम कडक' धुडगूस पाहा येत्या 2 डिसेंबरला
Ekdam Kadam Marathi Movie : 'एकदम कडक' अशा आकर्षक आणि धमाकेदार चित्रपटात एकदम कडक धाटणीचा आस्वाद येत्या 2 डिसेंबरला सिनेमागृहात घेता येणार आहे.
Ekdam Kadam Marathi Movie : 'एकदम कडक' (Ekdam Kadam) चित्रपटाचे एकामागून एक येणारे पोस्टर धुमाकूळ घालत आहेत. कॉलेज लाईफ अनुभवणाऱ्या मुलांचे पोस्टर प्रेक्षकांना चांगलेच आवडले. त्यानंतर आता मुलींच्याही पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'बबन' चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री गायत्री जाधव (Gayatri Jadhav), प्रांजली कझारकर (Pranjali Kazharkar), जयश्री सोनावणे (Jayashree Sonavane) या अभिनेत्री एकदम कडक अंदाजात पाहायला मिळणार असून अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) शिवाय अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao), चिन्मय संत (Chinmay Sant) तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे आणि अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता कॉलेजच्या मुली त्यांची कॉलेजलाईफ जगतायत, आणि ती कशी जगतायत हे येत्या 2 डिसेंबरला चित्रपटगृहात पाहणे रंजक ठरणार आहे.
'एकदम कडक' अशा आकर्षक आणि धमाकेदार चित्रपटात एकदम कडक धाटणीचा आस्वाद येत्या 2 डिसेंबरला सिनेमागृहात घेता येणार आहे. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तर हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.
'एकदम कडक' चित्रपटांच्या पोस्टरची लागलेली रांग पाहता चित्रपटाची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे, शिवाय पोस्टरवरील मुलीही आता रसिक प्रेक्षकांच्या समोर आल्याने चित्रपटातील मुलं आणि मुली मिळून नेमका काय धुडगूस घालणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल, येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :