एक्स्प्लोर

Varhadi Vajantri Movie : वऱ्हाडी वाजंत्रीची भन्नाट टायटल्स! 11 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Varhadi Vajantri Movie : वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटाचे टायटल्स विशेश आकर्षित करणारे आहेत.

Varhadi Vajantri Movie : चित्रपट ही एक मनोरंजनाची अद्भुत कला तर ती पाहणं हा विलक्षण अनुभव. आजपर्यंत विविध जातकुळीच्या चित्रपटातून प्रबोधनापासून मनोरंजनापर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत अनेकविध आशय विषयाने प्रतिभावंतांच्या प्रतिभा उजळल्या आहेत. आपल्या चित्रपटाला रसिकांच्या हृदयात स्थान मिळावे यासाठी ते नानाविविध प्रयत्न करताना दिसतात. असंच काहीतरी वेगळं अफलातून मनोरंजन करण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर (Vijay Patkar) सज्ज झाले आहेत. 11 नोव्हेंबरला वऱ्हाडी वाजंत्री हा धम्माल चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

अनेक चित्रपटांची टायटल्स रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. विषयाला अनुसरून आपल्या चित्रपटाची टायटल्स करण्यासाठी निर्माते दिग्दर्शक जंगजंग पछाडत असतात. विशेष टॅलेंटचा वापरून करून आकर्षक टायटल्स निर्मितीवर भर दिला जातो. अशाच काहीशा भन्नाट कल्पनांमध्ये आपल्या चित्रपटाचं नाव रसिकांच्या मनावर कोरण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सध्या गुंतले आहेत. त्यांच्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे टायटल्स तयार करण्याचे काम जोमात सुरु आहे. प्रख्यात पब्लिसिटी डिझायनर मिलिंद मटकर भन्नाट कल्पना रेखाटण्यात गुंग झाले आहेत. दिग्दर्शक विजय पाटकर आणि निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या संगनमताने या चित्रपटाची धम्माल उडवणारी श्रेयनामावली मिश्किल विनोदी हावभावांसह अनोख्या स्टाईलने पडद्यावर आणण्यासाठी त्यांची घालमेल सुरु आहे. 

नावाप्रमाणेच या चित्रपटात एकापेक्षा अवखळ विनोदवीरांना घेऊन दंगा करण्यासाठी विनोदाचा बादशहा मकरंद अनासपुरे ‘वऱ्हाडी वाजंत्र्यां’सह येत असून. त्याच्यासह 21 नमुनेदार विनोदवीरांची वेगळी छटा मिश्किल विनोदी ढंगात टायटल्समध्ये उमटविण्याचे अवघड काम ही त्रयी सध्या समरसून करीत आहे. मकरंद अनासपुरे यांचे भन्नाट कार्टून लहान थोरांना गुदगुल्या करणारे आहे. त्यासोबतच पंढरीनाथ कांबळे आणि हेमांगीचीही कार्टून्स भन्नाट झाली आहेत. याहून जबरदस्त म्हणजे मोहन जोशी, रीमा यांचे बुलेटराजा - राणी दर्शन आहे. त्यासोबतच प्रिया बेर्डे - विजय कदम यांचा ठुमक्याचा ठेका कमाल झाला आहे. तर जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही इरसाल नमुनेबाज व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या कथेसोबतच 'टायटल्समधेही धम्माल' करणार असल्याने हे ‘वऱ्हाडी वाजंत्री’ प्रेक्षागृहात हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.     

महत्वाच्या बातम्या : 

Har Har Mahadev : बॉक्स ऑफिसवरही दुमदुमला ‘हर हर महादेव’चा घोष! पहिल्याच दिवशी चित्रपटाने जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget